तळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण पाच दिवसांपासून बंद ; १८ते४४ वयो गटातील लसीकरण अद्यापही सुरुवात नाही.



तळा : किशोर पितळे
तळा प्राथमिक आरोग्यकेंद्रातील लसीकरण गेल्यापाचदिवसां पासून बंद करण्यातआले आहे. जिल्ह्यात लसीच्या अपुऱ्या साठ्यामुळे सर्वत्र लसीची कमतरता भासत असून लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर नागरिकांची गर्दी होत असल्याचे चित्र पहायला मिळतआहे.लसीच्या कमतरते मुळे४५ वर्षांपासून पुढील नागरिकांना सुरळीत लसीकरण होत नसताना महाराष्ट्र प्रशासनाने राज्यात १ मे पासून सर्वत्र १८ ते ४४ वयोगटापर्यंत लसीकरणास मान्यता दिलीआहे त्यामुळे लसीकरणाचा बोजवारा उडाला आहे.पुरेशा लसी उपलब्ध नसताना १८ ते ४५ वयोगटातील लसीकरणास सुरुवात करण्याची गरज काय असा प्रश्न देखील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. अगोदरच ४५ वर्षांवरील  नागरिक लसीकरणा पासून वंचित आहेत यामुळे लसीकरणाचा पोरखेळझालाआहे.आजपाचव्या दिवशीही लसींचापुरवठा झाला नसल्याने तळा प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण होऊ शकले नाही. आत्तापर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्राला १७५० डोस प्राप्त झाले आहेत त्यामध्ये एकूण २३ सत्र झालेलेअसून पहीलाडोस प्राप्त लाभार्थी १४२५ तर ३३४ नागरिकांनी दुसराडोस घेतला आहे. तालुक्यात हळूहळू कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिक लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातगर्दी करीत असून पुरेसा लस साठा उपलब्ध नसल्याने नागरिकांना रिकाम्या हाती घरी परतावे लागतअसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा