म्हसळयांत कोरोना पॉझीटीव्ह वाढले : दोन दिवसांत १४ नवीन रुग्ण पॉझीटीव्ह तर केवळ ६ रुग्ण बरे झाले :नियमांचे पालन होणे गरजेचे
संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा तालुक्यांत १ व २ मे या दोन दिवसांत तब्बल १४ नवीन रुग्ण पॉझीटीव्ह मिळाले तर केवळ ६ रुग्ण बरे झाल्याचे तालुका आरोग्य अधिकारी म्हसळा यानी कळविले आहे.तालुक्यांत आजपर्यंत एकूण बाधीत रुग्ण ४३९, उपचार घेत असलेले रुग्ण ३६ ,मृत्यू झालेले १९ आतापर्यंत ३८४ रुग्ण बरे झाले आसल्याचे प्रसीध्दी पत्रकात म्हटले आहे. दोन दिवसांत म्हसळा शहरांत ५ नवीन रुग्ण पॉझीटीव्ह, ग्रामिण भागात ९ नवीन रुग्ण पॉझीटीव्ह सापडले त्यामध्ये खारगाव(बु) १,खामगाव ४,खरसई २, पाष्टी व मेंदडी प्रत्येकी १ रुग्ण पॉझीटीव्ह मिळाले.उपचार घेत असलेल्या३६रुग्णा रुग्णांपैकी २१ जण घरीच विलगीकरण होऊन उपचार घेत आहेत तर ५ श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालय,३माणगाव उपजिल्हा रुग्णालय,तर ७ खाजगी रुग्णालयांत उपचार घेत आसल्याचे तालुका आरोग्य अधिकारी यानी कळविले आहे.
"म्हसळा तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने शासना ने अधिक कडक भूमिका घेणे आवश्यक आहे. मार्गदर्शक तत्त्वे तसेच कंटेनमेंट झोन उपविभागीय अधिकारी यानी जाहीर करणे व प्रसीद्धी देणे आवश्यक आहे.contact Tresing (संपर्क ट्रेसिंग) साखळी तोडण्या साठी मदत करते,कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग कोव्हीड - मध्ये उघडकीस आलेल्या कोणालाही शोधण्याची आणि त्यांच्याशी संपर्क साधण्याची महत्वाची प्रक्रिया आहे. एखाद्याची चाचणी सकारात्मक येते तेव्हा स्थानिक आरोग्य विभाग आणि जिल्हा आरोग्य विभागाने संक्रमित झालेल्या लोकांना आणि संक्रमित शोधण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या पाहीजेत. संपर्क जितक्या वेगाने शोधू शकतो तितक्या लवकर आपण कोविड चा प्रसार रोखू शकतो "
"संपर्क ट्रेसिंग नसल्यास कोरोना नियंत्रित केले जाऊ शकत नाही ": डब्ल्यूएचओ
खारगाव बुद्रुक मध्ये कोण positive आहे त्याच नाव कळेल का?
ReplyDeletePost a Comment