मकरंद जाधव-बोर्लीपंचतन
श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिध्द पर्यटन स्थळ दिवेआगर येथील विस्तिर्ण अशा समु़द्रकिनाऱ्यावर भरतीच्या पाण्याने किनारपट्टीची होणारी प्रचंड धुप त्यातच निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने किनाऱ्यावरील सुरुची झाडे जमिनदोस्त झाल्याने तेथील नागरी वस्तीला निर्माण झालेला धोका टाळण्यासाठी गेले काही वर्षे धुप प्रतिबंधक बंधाऱ्याची मागणी होत होती.समुद्र किनाऱ्याजवळील नागरी वस्तीला होणाऱ्या धोक्याचा गांभीर्याने विचार करुन महाराष्ट्र शासनाने यासाठी अडीच कोटी रुपये निधी मंजुर केला असुन पहील्या टप्प्यामधील दिवेआगर कोळीवाड्यापासुन दोनशे दहा मिटरच्या धुप प्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामाचे भुमीपूजन १ मे महाराष्ट्र दिनी जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदीती तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाले. पहील्या टप्प्यामधील दोनशे दहा मिटरच्या कामाला आज दि.२ मे रोजी सुरवात झाली असुन हे काम पुर्ण होताच त्यापुढील किनाऱ्याचे टप्प्या टप्प्याने सुशोभीकरण करण्यात येईल असे आदीती तटकरे यांनी सांगीतले.
मात्र निसर्ग चक्रीवादळाने समु़द्र किनाऱ्यालगतची मोठ्या प्रमाणात जमिनदोस्त झालेली सुरुची झाडं आणि दिवेआगर समु़द्रकिनाऱ्याचं वैभव असलेल्या केवड्यांच्या झाडांची जर मोठ्या प्रमाणात पुन्हा लागवड झाली तर समु़द्रावरुन गावात वेगाने येणारे वारे व वाळू थांबुन गावाचं संरक्षण होईल असे मत ग्रामस्थांची आमच्या प्रतिनिधीजवळ व्यक्त केले कोरोना नियमावलीचे पालन करुन झालेल्या या भुमिपुजन कार्यक्रम प्रसंगी श्रीवर्धन उपविभागीय आधिकारी अमित शेडगे,निवासी नायब तहसीलदार प्रज्ञा काकडे, दिवेआगर सरपंच उदय बापट, उपसरपंच सानिका केळसकर,ग्राम पं.सदस्य,ग्रामसेवक शंकर मयेकर, मंडळ आधिकारी सुनिल मोरे,सुवर्ण गणेश मंदीर समितीचे अध्यक्ष महेश पिळणकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment