जळगाव पुणे दिघी या राष्ट्रीय मार्गावरील घोणसे घाटांत क्वॉलीस गाडीला अपघात : १० जण जखमी .
संजय खांबेटे : म्हसळा
जळगाव पुणे दिघी बंदर या राष्ट्रीय महामार्ग 753F या रस्त्यावरील म्हसळया नजीक असणाऱ्या घोणसे घाटात MH 02-MA5038या क्वॉलीस गाडीला अपघात होऊन जीप मधील एकाच कुटुंबातील १० प्रवासी जखमी झाले. यामध्ये १) मनोज दशरथ खराडे वय ४३, २) अलका मनोज खराडे वय ४, ३) अर्णव मनोज खराडे वय १६ ,४) सुप्रिया किरण खराडे वय २५, ५) किरण कृष्णा खराडे वय ३०, ( सर्व रहाणार मोर्बा) ६) साक्षी सुजित पवार, वय २५ ७) सोनम निलेश भोसले वय २९, ८) शुभ्रा निलेश भोसले वय ६, ९) राजेश महादेव शिंदे वय ४५, १०) तन्वी निलेश भोसले वय ९(सर्व रहाणार आदगाव) ही मंडळी जखमी झाले.
लग्नानंतरचा धार्मिक कार्यक्रम उरकून सुमारे १५ ते २० मंडळी मोर्बाहून आदगाव येथे जात असताना घोणसे घाटांतील उतारांत चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी डावीकडे असणाऱ्या डोंगरावर आदळून अपघात आज सायं ५चे दरम्यान झाला.जखमींवर तात्काळ म्हसळा ग्रामिण रुग्णालयात डॉ.महेश मेहता,डॉ.अलंकार करंबे , डॉ.नदीम लोखंडे व कर्मचाऱ्यानी उपचार केले.
Post a Comment