भाताच्या उत्पादन वाढीसाठी तळा कृषी विभाग राबविणार बीज प्रक्रिया मोहीम.



तळा- किशोर पितळे
कोकणात भात हे मुख्य पिक असुन पुर्वीचा कुलाबा जिल्हा याला भाताचे कोठार म्हणून जिल्ह्याचीओळख होती.पंरतु कालपरत्वे निसर्ग लहरीमुळे बदलत्या हवामानामुळेभात पिकाचेउत्पादन कमी होऊ लागल्याने व प्रचंड महागाईने शेती परवडत नसल्याने व बी बियाणांचे बदलते वाण यामुळे भात पीक उत्पादन कमी होऊ लागल्याने शेतकरी कमी प्रमाणात भात पिक घेऊ लागलाअसल्याने तालुका कृषी कार्यालयानेभात उत्पादनवाढीसाठीबीज प्रक्रिया मोहीम राबविण्यात येतआहे.तळा तालुका डोगराळ व दुर्गम असून तालुक्यातील भात हे मुख्य पीक असून ८५ % पेक्षा जास्त शेतकरी सरळ किंवा सुधारित वाणांचा वापर करतात.त्यामुळे एकदा बियाणे खरेदी केल्यानंतर तीन वर्षापर्यंत तेच बियाणे वापरले तरी चालते. त्यामुळे दर वर्षी बियाणे खरेदी करण्याचाखर्च वाचण्यास मदत होणार आहे परंतु घरच्या बियाणांला प्रक्रिया न केल्यामुळे उत्पादनामध्ये घट येते. बीज प्रक्रियेमुळेउगवणक्षमतावाढते.त्याच बरोबरजमिनीतून व बियाणांच्या मधून पसरणाऱ्याबुरशीजन्य रोगाचा वेळीच बंदोबस्त झाल्याने उत्पादन वाढ होते.हाचउद्देश ठेवून कृषी विभागाच्या माध्यमातून रोहिणी नक्षत्र पंधरवडा १५ मे पासून राबविण्यात येणार असून गावोगावी बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखवण्यात येणार असल्याची माहिती सागर वाडकर मंडळ कृषी अधिकारी तळा यांनी दिली. 

         भातामध्ये बीजप्रक्रिया तीन प्रकारे केली जाते १)मिठाच्या पाण्याची बीजप्रक्रिया- यामध्ये १० लिटर पाण्यात ३०० ग्रॅम मिठ विरघळून घ्यावे व त्यामध्ये भात बियाणे ओतावे व चांगले ढवळून घ्यावे. त्यानंतर द्रावण स्थिर होऊ द्यावे.पोकळ व रोगाने हलके झालेले तरंगणारे बियाणे अलगत वरचेवर काढून घ्यावे. तसेच तळाशी राहिलेले वजनदार व निरोगी बियाणे बाहेर काढून ते दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन सावलीत २४ तास वाळवावे व त्यानंतर रोगप्रतिबंधक उपाय म्हणून बुरशी नाशकाची बीजप्रक्रिया करावी.  २)बुरशी नाशकाच्या बीजप्रक्रियेमुळे बियाणामध्ये राहणाऱ्या व तसेच उगवल्यानंतर अपायकारक ठरणाऱ्या बुरशीचा नायनाट होतो. यामध्ये थायरम, कॅप्टन किंवा कार्बेन्डाझिम यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक २.५ ग्रॅम या प्रमाणात १ किलो बियाणास पेरणीपूर्वी चोळावे.३)जिवाणू खताची बीजप्रक्रिया बियाणे रुजल्यापासून पिकाच्या पुढील वाढीसाठी आवश्यक असलेले नत्र व स्फुरंद सहज उपलब्ध व्हावे म्हणून जिवाणू खताचीबीजप्रक्रिया केली जाते.यामध्ये पी एस बी (स्फुरद विरघळणारे जिवाणू) हे जिवाणू जमिनीतील स्पुरद पिकाला उपलब्ध करून देतात. अझोटोबॅक्टरनत्र स्थिरीकरण करणारे जिवाणू हे जिवाणू हवेतील नत्र स्थिर करून पिकास उपलब्ध करून देतात. वरील दोनही जिवाणू खताचे प्रमाण प्रत्येकी २५०ग्रॅम प्रति१० किलो बियाणे याप्रमाणेआहे.

वरीलप्रमाणे शेतकऱ्यानी कृषी विभागाच्या सल्ल्याने योग्य आधूनिक पध्दतीने शेती केली तर निश्चितच भात पीकाचे उत्पादन वाढीस मदत होणार आहे.असा विश्वास कृषी अधिकारी यांनी दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा