तळा किशोर पितळे
सुप्रसिद्ध गायिका पद्मश्री डॉ.अनुराधा पौडवाल यांच्या सुर्योदया फाउंडेशन मार्फत व रायगड भूषण कृष्णा महाडिक यांच्या प्रयत्नाने रायगड जिल्ह्यातील पाच शासकीय रुग्णालय मध्ये आँक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन आरोग्य यंत्रणेला देऊनसामाजिक दायित्वनिभावले.आपदग्रस्तकाळात शासनाच्या मदतीला नेहमी सामाजिक बांधिलकी जपत हे संस्था मदतीचा हात पुढे करीत असते.मग शैक्षणिक, सामाजिक कार्यात सदैव पुढे असते.निसर्ग चक्रीवादळात अनेक घरांची पडझड,शाळा काँलेज, याचे छप्पर उडालेअसतानाच मदतीचा हात पुढे केला तर कधी पाणी टंचाईग्रस्त गावाला पाण्याची सोय उपलब्ध करूनदिली आहे.याचाच एकभाग म्हणून सद्यपरिस्थितीत आपदग्रस्त कोरोना काळात रूग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून प्राणवायूची कमतरता पडत असल्याचे लक्षात घेऊन सुर्योदयाफांऊंडेशनच्या सर्वेसर्वा डॉ.अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते घाटकोपर येथे९मे२१रोजीदेण्यात आले.रायगड जिल्ह्यातील१) माणगांव शासकीय रुग्णालय कोविड सेंटर- २ ऑक्सिजन मशीन २) श्रीवर्धन शासकीय रूग्णालय कोविड-२ ऑक्सिजन मशीन ३) लोणेरे शासकीय कोविड सेंन्टर - २ऑक्सिजन मशीन ४) तळा ग्रामीण रुग्णालय -१ ऑक्सिजनमशीन ५) म्हसळा शासकीय ग्रामीण रुग्णालय -१ ऑक्सिजन मशीन ६) जे जे रुग्णालय मुंबई -३ ऑक्सिजन मशीन अशी ११ आँक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन डोनेटकरण्यात आली. त्यावेळी रायगड भूषणतथा नाना पालकर स्मृती प्रतिष्ठानचे व्यवस्थापक कृष्णा महाडिक, जे जे रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संजय सुरासे श्रीवर्धन शासकीय रुग्णालयाचे अधिक्षक डॉ मधुकर ढवळे, माणगाव शासकीय रुग्णालयाचे अधिकारी डॉ प्रदीप इंगोले , म्हसळा शासकीय रुग्णालयाचे डॉ. महेश मेहता बबन मनवे, तळाप्राथमिक आरोग्य केंद्राचे वतीने सामाजिक कार्यकर्ते महेन्द्र कजबजे नगरसेवक चंद्रकांत रोडे उपस्थित होते.
Post a Comment