संजय खांबेटे : प्रतिनिधी
लॉक डाउन मध्ये दुकाने बंद ठेवण्याचा आदेश असतानाही दुकाने उघडी ठेवली जात आसल्याने म्हसळा शहरातील ९ दुकानदारांवर म्हसळा पोलीसानी कारवाई केली असल्याचे प्रसीध्दी माध्यमाला सांगितले. यामध्ये चप्पल, कटलरी, कापड व अन्य व्यवसायीकांचा समावेश आहे.सदरची कारवाई भा.द.वि.सं कलम १८८,२६९,२७० तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम २००५ चे कलम ५१ ए सह महाराष्ट्र कोव्हीड १९उपाय योजना नियम २०२०चे नियम११ सह साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियम १९८७चे कलम २,३,४ अन्वये कारवाई केल्याचे स.पो.नी.उध्दव सुर्वे यानी सांगितले.
Post a Comment