निकेश कोकचा : म्हसळा
म्हसळा तालुक्यातील चिखलप आदिवासी वाडी मधून दोन मुली बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे.
शुक्रवार दिनांक ९ एप्रिल रोजी चिखलप आदिवासी वाडी येथील शारदा रमेश पवार व गंगा शंकर पवार या दोन मुली घरी कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेल्या आहेत. अद्यापही या मुली घरी परतल्या नसून त्यांचा शोध सुरु आहे. यामध्ये शारदा रमेश पवार हिचा रंग सावळा,बांधा सडपातळ,चेहरा उभा असून गंगा शंकर पवार हिचा रंग सावळा बांधा सडपातळ चेहरा उभा असून कोणालाही या मुली निदर्शनास आल्यास म्हसळा पोलीस ठाणा क्रमांक ०२१४९ २३२२४०/९४२२३१५९४६ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन पोलीस उप निरीक्षक दीपक धूस यांनी केले आहे.
Post a Comment