श्रीवर्धन. प्रतिनिधी
श्रीवर्धन मधील वनपरिक्षेत्र कार्यालयाची इमारतीचे पालकमंत्री नाम आदितीताई तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सदर प्रसंगी त्यांनी उपस्थित वन खात्यातील कर्मचारी व अधिकारी वर्गाशी संवाद साधला. त्यांच्या अडीअडचणी, निवास गृह या बाबींविषयी चर्चा केल्यानंतर वनपरिक्षेत्र परिसराची पाहणी केली. पालकमंत्री अदितीताई तटकरे यांच्या हस्ते वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. श्रीवर्धन तालुक्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व तालुक्यातील आरोग्यव्यवस्था , आज मितीस तालुक्यातील कोरोना बाधित रुग्ण संख्या, हॉस्पिटल मधील बेडची व्यवस्था , व त्या संबंधित विविध माहिती अधिकारी वर्गाकडून घेण्यात आली. सदर प्रसंगी श्रीवर्धन प्रांताधिकारी अमित शेडगे, उपवनसंरक्षक रोहा राकेश सपेट, विश्वजीत जाधव, वन परिक्षेत्र अधिकारी मिलिंद राऊत, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दर्शन विचारे, श्रीवर्धन नगराध्यक्ष फैसल हुरजूक, माजी नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक .मुख्याधिकारी किरण कुमार मोरे ,वन खात्याचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.
Post a Comment