जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला.


टीम म्हसळा लाईव्ह

जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी नुकताच जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार व इतर समन्वय अधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. 
       या संवादादरम्यान त्यांनी "ताऊत्के" या चक्रीवादळाच्या अनुषंगाने स्थानिक प्रशासनाने सुरक्षिततेच्याबाबत केलेल्या तयारीचा आढावा घेतला.  
       तसेच सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार व  इतर सर्व यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सतर्क व सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या.


जिल्ह्यातील समुद्रकिनारी राहणाऱ्या 6 हजार 487 नागरिकांचे स्थलांतरण झाले पूर्ण

"ताऊक्ते" चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारी राहणाऱ्या आतापर्यंत  6 हजार 487 नागरिकांचे स्थलांतरण पूर्ण झाले असून तालुकानिहाय  स्थलांतरित लोकांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे---
अलिबाग-344, पेण-193, मुरुड-1067, पनवेल-168, उरण-451, कर्जत-0, खालापूर-176, माणगाव-490, रोहा- 478, सुधागड-165, तळा- 135, महाड-1080, पोलादपूर-86, म्हसळा- 496,  श्रीवर्धन- 1158
     या एकूण  6 हजार 487 लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा