पन्हळघर बुद्रुक (राम भोस्तेकर)
रायगड जिल्ह्यातील महत्त्वाच्या समजल्या ग्रामपंचायती पैकी एक असलेली माणगाव तालुक्यांतील लोणेरे ग्रामपंचायतीच्या सुमारे तीन कोटी सदुसष्ठ लाख निधी राष्ट्रीय पेयजल योजनेतून महाड विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार भरतशेट गोगावले यांच्या शुभहस्ते संपन्न झाली असून गेली कित्येक वर्षे लोणेरकरांना अपेक्षित असलेली नळपाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा पार पडला असून अखेर लोणेरे नळपाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ झाल्याने अखेर लोणेरकरांकडून समाधान व्यक्त करताना दिसत आहेत.
लोणेरे तंन्त्रशास्त्र विद्यापीठ व मुंबई गोवा हायवेलगत लोणेरे गावचे वास्तव्य असल्याने लोणेरे गावचे नाव सबंध महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. मुळात विद्यापीठ व महामार्ग लगत असल्याने लोणेरे दिवसेंदिवस झपाट्याने वाढताना दिसत आहे. तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य प्रमोद घोसाळकर यांनी जवळपास अठरा वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेमार्फत नळपाणी पुरवठा योजना मंजूर करून आणत त्याचवेळी लोणेरकरांचा पिण्याचा प्रश्न निकाली काढला होता परंतु चौदा वर्षात लोणेरे गावची वाढलेली लोकसंख्या, वाढती बाजारपेठ, घर यामुळे लोणेरेकरांना मागील काही वर्षे पिण्याच्या पाण्याचे हाल होताना दिसले त्यामुळे आमदार गोगावले यांच्या माध्यमातून लोणेरेकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अखेर निकाली काढला.
करोनाच्या पार्श्वभूमीवर सोशियस डिस्टन्सिंग वापरत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला.
यावेळी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, जिल्हा परिषद सदस्या अमृता हरवंडकर, पंचायत समिती उपसभापती महेंन्द्र तेटगुरे, माजी पंचायत समिती नथुराम करकरे, लोणेरे सरपंच रवी टेंबे, उपसरपंच प्रमोद करकरे, संजय घोसाळकर, अरूण चाळके यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, संबंधित अधिकारी व लोणेरकर उपस्थित होते.
Post a Comment