अन्याय करणे गुन्हा आहे, अन्याय सहन करणे हा त्याहून मोठा गुन्हा आहे. - संजय यादवराव




मागील दोन वर्षात कोकणची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे   . यावेळी तरी आवाज उठवणे गरजेचे आहे.

कोल्हापूर आणि सांगली मध्ये पाऊस पडला की तो महत्वाचा
मराठवाड्यात दुष्काळ पडला की तो महत्त्वाचा
नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडला तर तो महत्वाचा
विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या महत्वाच्या
याकरिता हजारो कोटीची पॅकेजेस दिली जातात आणि ती दिलीच पाहिजेत याबद्दल दुमत नाही

पण....
गेली दहा वर्ष महाराष्ट्राला विदेशी चलन मिळवून देणारा मच्छिमार आणि मत्स्य दुष्काळ महत्त्वाचा नाही
मागच्या निसर्ग वादळात 10 हजार कोटीहून अधिक नुकसान आणि निम्मे कोकण उध्वस्त झाले ते महत्त्वाचे नाही
मुळात 20 टक्के आलेला हापूस आंबा आता चक्रीवादळात पूर्ण उध्वस्त होईल ते महत्त्वाचं नाही.
इथली मुख्य अर्थव्यवस्था आणि उद्योग पर्यटन पार धुळीला मिळाला आहे तो महत्वाचा नाही
निसर्ग चक्रीवादळ, अंबा सीजन मध्ये आलेला कोरोना, आणि आत्ताचे किनारपट्टीवरून जाणारे चक्रीवादळ संपूर्ण कोकणची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. ती महत्त्वाची नाही

समंजस आणि सोशिक कोकणी माणूस तरीही काही बोलणार नाही, सरकार समोर हात पसरणार नाही. प्रसिद्धीमाध्यमे कोकणातील नुकसानीबद्दल कधी बोलणार नाहीत , कापूस ऊस साखर कारखाने यासाठी भांडणारे लोकप्रतिनिधी कोकणातील पर्यटन मच्छीमार आणि शेतकरी या बद्दल कधी विधानसभेत भांडणार नाहीत.कर्जबाजारी कोकणातील मच्छीमार आणि आंबा बागायतदार पुन्हा एकदा स्थलांतरित होतील. इथले तरुण इथे काहीच घडणे शक्य नाही असा समज करून आपली स्वर्गासारखे गावे सोडून मुंबईला जाऊन झोपडपट्ट्यांमध्ये राहतील, पुन्हा एकदा कोकणात रिकामे होण्याची प्रक्रिया अधिक गतिशील होईल. बाहेरून येणारे धनदांडगे कोकणातल्या बागा आणि जमिनी विकत घेण्याच्या स्पर्धा करतील. हे अतिशय क्लेशदायक आहे.
किती सहन करणार कोकणातली माणसे, खरंच ही आपली सहनशीलता आहे की उदासीनता. 

मित्रांनो आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे.

अन्याय करणे चुकीचे आहे त्याहून अधिक अन्याय सहन करणे हे चुकीचे आहे. वर्षानुवर्ष आपल्या सहनशक्तीचा शासकीय व्यवस्थांनी चुकीचा अर्थ घेतला आहे ही परिस्थिती बदलली पाहिजे.

संजय यादवराव
कोकण भूमी प्रतिष्ठान
समृद्ध कोकण संघटना

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा