शासन दरबारी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी त्वरित कार्यवाही करावी.
म्हसळा -प्रतिनिधी
कोरोना प्रादुर्भाव काळातील दुसऱ्या लाटेत म्हसळा तालुक्यात 200 हुन अधिक रुग्ण बाधीत सापडले आहेत.बाधीत रुग्णावर तालुका स्तरावर उपचारासाठी शासनाने म्हसळा तालुक्यातील वरवठणे येथे आयटीआयचे इमारतीत 40 बेडचे अद्यायावत कोविड केअर सेंटर उभारले आहे.कोविड सेंटरमध्ये फक्त बेड उपलब्ध आहेत परंतु ते आज पर्यंत कार्यान्वित केले नसुन एकही बाधीत रुग्णाला किंवा लक्षणे दिसून आलेल्या रुग्णास ऍडमिट करून घेतल्याची नोंद नाही असे असल्याने हे कोविड केअर सेंटर केवळ नावाला सज्ज ठेवले आहे.सदरचे कोविड सेंटर कार्यान्वित करण्याची मागणी म्हसळा पंचायत समितीचे माजी सभापती महादेव पाटील यांनी पालकमंत्री ना.आदिती तटकरे यांना पत्र लिहून केली असल्याचे पत्रकारांजवळ वार्तालाप करताना सांगितले.म्हसळा तालुक्यात सद्याचे स्थितीत 475 बाधीत रुग्णांची नोंद झाली आहे तर 52 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.उपचार घेत असलेले रुग्ण श्रीवर्धन,उपजिल्हा रुग्णालय माणगाव,जिल्हा रुग्णालय अलिबाग,काही खाजगी दवाखान्यात तर अनेक रुग्णांवर घरीच विलगीकरण कक्षात उपचार केले जात आहेत.खासदार सुनिल तटकरे,पालकमंत्री आदिती तटकरे यांचे आदेशानुसार म्हसळा तालुक्यासाठी कोविड केअर सेंटरची पूर्वनियोजित तयारी केली असताना ते कार्यान्वित करण्यात आले नसल्याने जर कोरोनाची तिसरी लाट फोफावलीच तर गोरगरीब रुग्णाचे हाल होतील.सद्याचे घडीला म्हसळा तालुक्यातील कोरोना प्रादुर्भाव बाधीत रुग्ण संख्या कमी आसुन परिस्थिती नियंत्रणात आहे परंतु भविष्याचा विचार करता म्हसळा कोविड सेंटर व ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन बेडसह चांगल्या आरोग्य सेवेची नितांत गरज आहे या कामी तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी माजी सभापती महादेव पाटील यांनी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे केली आहे.तालुक्यातील जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणा व म्हसळा ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिक्षक,पुरेसे कर्मचारी त्याच बरोबर तांत्रिक सुविधा उपलब्ध नाहीत.वरवठणे येथील कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यासाठी दोन वैद्यकीय अधिकारी,तीन परिचारिका,लॅब टेकनिशियन,औषध निर्माता, डाटा एंट्री ऑपरेटर,तीन सफाई कामगार,तीन सुरक्षा रक्षक पदांची आवश्यकता आहे.पालकमंत्री आदिती तटकरे यांनी म्हसळा ग्रामीण रुग्णालयात भेट दिली असता त्यांनी ऑक्सिजनच्या उपलब्धतेसह 20 ते 30 बेडचे "डेडिकेटेड कोविड सेंटर"सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.हे सेंटर सुरू झाल्यास तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णाला बेडची वेळीच उपलब्धता होऊन त्यांना मोफत आरोग्य सेवा मिळणार असल्याने त्याची तातडीने अंमलबजावणी करावी असे महादेव पाटील यांनी मागणी बाबत वार्तालाप करताना सांगितले.
Post a Comment