स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची विशेष कामगिरी ; मोबाईल चोर आरोपी याकूब मुसा शेख याला मुद्देमालासह अटक



संजय खांबेटे :  म्हसळा 
             पेण पोलीस ठाणे हद्दीतील फिर्यादी हे त्याच्या मोबाईलच्या दुकानातून 1,27,793/- रुपये किमतीचे 57 मोबाईल हँडसेट एका नायलॉनच्या पिशवीत घेऊन  मोटरसायकल वरून अलिबाग ते उरण येथे जात असताना पेण पोलीस ठाणे हद्दीत मुंबई गोवा रोडवर लघुशंकेला करता थांबले असता अज्ञात इसमाने 57 मोबाईल हँडसेट असलेले नायलॉन ची पिशवी मोबाईल हँडसेटसहित चोरून नेले बाबत गुन्हा रजिस्टर नंबर 73/2021 कलम 379 प्रमाणे दाखल आहे 
        स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेकडील सपोनि धनंजय पोरे आणि पोलीस हवालदार प्रतीक सावंत, सचिन शेलार, स्वप्नील येरुणकर,पांडू पाटील आणि अभियंती मोकल यांनी या गुन्ह्याचा समांतर तपास करून तांत्रिक माहितीच्या आधारे इसम नामे याकूब मुसा शेख रा.फणस डोंगरी ता.पेण यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने नमूद गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेले 1,05,000/- रुपये किमतीचे 45 मोबाईल हँडसेट (85% of stolen property) हस्तगत केले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा