म्हसळा -प्रतिनिधी
कोरोना आणि लॉकडाऊन ही आता नित्याचीच बाब झाली आहे त्यामुळे अनेक ग्रामीण निवासी मुंबई शहरातील चाकरमानी कामधंदा बंद असल्याने गावाला येवुन बसले आहेत.असे असले तरी अनेकांना स्वतःचा काम धंदा करून समाजसेवा करण्याची खुप आवड असते.सामाज सेवा करणारा माणूस गप्प बसला तर तो कार्यकर्ता कसला.म्हसळा तालुक्यातील संदेरी गावचे सामाजिक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते संतोषभाई ताम्हणकर हे कोरोना योध्दा म्हणुन स्वखर्चाने संदेरी गावातील लोकांना मोफत प्रवास सेवा देत आहेत.कोरोना प्रादुर्भाव पासून बचाव करण्यासाठी शासनाने मोठया प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेतली आहे परंतु ग्रामीण भागात लसीकरण केंद्र कोसो दुर असल्याने संतोषभाई देवदूता सारखे मदतीला धावून आले आहेत. गावातील सर्वच जेष्ठ नागरिकांना खामगाव आणि केस्तुली येथील लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी मोफत प्रवास सेवा देत आहेत त्याच बरोबर जेष्ठ नागरिकांच्या हातातील सामानसुमान स्वतः सॅनिटायझर करून कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी काळजी घेत आहेत.संदेरी गावाचे संतोषभाई ताम्हणकर यांच्या या सामाजिक सेवेचा सर्वत्र कौतुक होत आसुन त्यांना ग्रामस्थ धन्यवाद देत आहेत.
Post a Comment