दिनांक 20 मे पासुन म्हसळा बाजरपेठे पुर्ण वेळ चालु राहणार - म्हसळा नगर पंचायतीने दवंडी देवुन केले जाहीर
टीम म्हसळा लाईव्ह
म्हसळा नगर पंचायतीने शहरातील सर्व नागरिक व दुकानदार यांना दवंडी देवुन जाहीर केले आहे की , दिनांक 20 मे पासुन माननीय जिल्हाधिकारी अलिबाग , कार्यालय यांच्या कडील आदेशानुसार पुढील आदेश होईपर्यंत शहरातील खालील नमुद करण्यात आलेली सर्व दुकाने पुर्ण वेळेसाठी चालु राहतील तशा प्रकारे आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडील दिनांक 19 मे 2021 रोजीच्या आदेशान्वये किराणा , भाजी विक्रेते , फळ विक्रेते , रास्तभाव धान्य दुकाने , फॅब्रिकेशनची काम करणारे , आस्थापना , दुध डेरी ,, अवजारे , शेतातील उत्पादनाशी निगडित दुकाने , सिमेंट पत्रे , ताडपत्री , विद्युत उपकरणे , हार्डवेअर सामान विक्री करणारे दुकाने दिनांक 20 मे 2021 पासुन पुर्णवेळ चालु राहतील तसेच मजुरांच्या सहाय्याने दुरुस्तीच्या पुनर्बाधणीची कामे करण्यासाठी मान्यता देण्यात आली असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले आहे.जिल्हा शासनाच्या वरील आदेशाने लॉकडाऊनमध्ये गेली दिड महिने कामधंद्याविना अडकून पडलेले सर्वसामान्य नागरिक आणि दुकानदार यांना दिलासा मिळणार आहे.थोड्या प्रमाणात का होईना लोकांच्या हाताला काम आणि पोटाची भुक भागविण्यासाठी मोकळीक मिळाल्याने आम जनता सुटकेचा निश्वास घेईल एवढे नक्कीच.कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी मिळून शासनाच्या नियमांचे व आदेशाचे पालन केल्यास सर्वांचे हिताचे ठरेल यात शंका असणार नाही .
Post a Comment