म्हसळा : सुशील यादव
“क्रेडीट एक्सेस ग्रामीण लिमिटेड” म्हसळा शाखे तर्फे म्हसळा पोलीस ठाण्याला मास्क आणि सॅनिटाइजर चे बुधवार दि. १९/०५/२१०२१ रोजी वाटप करण्यात आले. संपूर्ण राज्यात तसे देशात कोरोना ने थैैैैमान घातले असुन अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामध्ये आपल्या जीवाची परवा न करता अनेक कोरोना योद्धा या काळात कोरोनाशी दोन हात करीत आहेत. यामध्ये महाराष्ट्र पोलीस देखील मागे नाहीत. गेल्या संपूर्ण वर्षा मध्ये अनेक पोलीस अधिकारी , कर्मचारी यांनी कोरोना काळात कर्तव्य बजावताना आपले प्राण गमावले आहेत. तरीही आजही कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत सुद्धा महाराष्ट्र पोलीस निर्भीडपणे आपले कर्तव्य चोख बजावत आहेत. या आपल्या पोलीस बांधवांच्या अनमोल कार्याची दाखल घेत “क्रेडीट एक्सेस ग्रामीण लिमिटेड” म्हसळा शाखे तर्फे म्हसळा पोलीस ठाण्याला मास्क व सॅनिटाइजर चे वाटप करण्यात आले. यावेळी म्हसळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उद्धव सुर्वे, पोलीस उपनिरीक्षक दीपक ढुस यांच्या समवेत त्यांचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते. “क्रेडीट एक्सेस ग्रामीण लिमिटेड” चे एरिया मॅनेजर राम माने , ब्रॅॅंच मॅनेजर कुंडलिक गायकवाड यांनी सदर वस्तूंचे वाटप केले.
Post a Comment