आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री ना. विजय वडेट्टीवार रायगड जिल्हा दौरा



टीम म्हसळा लाईव्ह 
राज्याचे इमाव बहुजन कल्याण विभाग, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री ना.विजय वडेट्टीवार हे दि.20 मे 2021 रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा पुढीलप्रमाणे...
      गुरुवार दि. 20 मे 2021  रोजी सकाळी 09.10 वा. पुणे विमानतळ येथे आगमन व शासकीय वाहनाने माणगाव, जि.रायगडकडे प्रयाण. ( मार्ग पुणे- मुळशी- माणगांव).दुपारी 12.30 वा. माणगाव, जि.रायगड येथे आगमन व तौक्ते वादळामुळे माणगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा. दुपारी 02.00 वा. म्हसळा जि.रायगड येथे आगमन व तौक्ते वादळामुळे म्हसळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांचा पाहणी दौरा. दुपारी 02.30 वा. राखीव. दुपारी 03.30 वा. श्रीवर्धन, जि.रायगड येथे आगमन व तौक्ते वादळामुळे श्रीवर्धन तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा. सायं. 04.00 वा. रायगड जिल्ह्यात तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानाची आढावा बैठक.(स्थळ:- मध्यवर्ती प्रशासकीय भवन, श्रीवर्धन, जि.रायगड).सायं. 4.30 वा.पत्रकार परिषद (स्थळ: मध्यवर्ती प्रशासकीय भवन, तळमजला, श्रीवर्धन, जि. रायगड). सायं. 06.00 वा. श्रीवर्धन येथून शासकीय वाहनाने रत्नागिरी कडे प्रयाण.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा