म्हसळा बाजारपेठेत गर्दी रोखण्यास म्हसळा प्रशासन अपयशी


म्हसळा बाजारपेठेत गर्दी रोखण्यास म्हसळा प्रशासन अपयशी

नगरपंचायत सहित प्रशासनाचा अक्षम्य दुर्लक्ष

पोलिस यंत्रणा कुचकामी नगरपंचायतीचा शहराकडे फवारणीसहित गटाराकडे दुर्लक्ष

म्हसळा महेश पवार

संपूर्ण महाराष्ट्रात  कोरोंनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. या अनुषंगाने पुन्हा एकदा कडक निर्बंधा सहित लॉकडाउन सुरू केले आहे परंतु या लॉकडाऊनची म्हसळा शहरात ऐशी की तैशी पहण्यास मिळत आहे. मुळात म्हसळा तालुका हा  ग्रामीण भागाने विखुरले आहे. काही निवडक गावे पाहता म्हसळा शहराच्या जवळ आहेत परंतु 90 % गावे ही शहरापासून खूप दूरवर आहेत. अशा परिस्थित म्हसळा शहरात ग्रामीण भागातून येणारा लोंढा हा खूप मोठ्या प्रमाणात येत असतो. परंतु येणार्‍या नागरिकांची सुस्थितीत पूर्व नियोजन करणे हे स्थानिक प्रशासनाला जमत नसल्याचे मत तेथील स्थानिक नागरिक करत आहे. शहरात येणारे नागरिक हे 90% ग्रामीण भागातून येत असतात. परंतू येथील म्हसळा नगर पंचायत कोणत्याच प्रकारच नियोजन केले नाही. पूर्वी प्रमाणे म्हसळा शहराच्या मुख्य गेटवर सेनीटायझर स्टँडची उभारणी केली होती संपूर्ण शहरात फवारणी केली जात होती, गटारांची स्वच्छता राखली जात होती परंतु आताच्या परिस्थित नगरपंचायत यावेळी कोणतीच भूमिका बजावताना दिसत नाही. पहिल्या लाटेपेक्षा आताची लाट म्हसळा तालुक्याठी धोक्याची घंटा आहे. असे असताना प्रशासन मात्र शांत आहे. ज्याप्रमाणे नियोजन बद्ध लॉकडाऊन असायला पाहिजे तसे नसल्याने शहरात भली मोठी गर्दी पाहण्यास मिळत आहे. या विषयाकडे आताच गाभिर्याने लक्ष दिले नाही तर पुढील परिस्थिति आटोक्यास येण्यास जिगरीचे होणार आहे

पूर्वी प्रमाणे गावागावात पथक निर्माण केले होते ते पथक गावाच्या सुरुवातीलाच आपली टिम घेवून बाहेरून येणार्‍या नागरिकांची चौकशी करत त्यांचे प्राथमिक आरोग्य तपासणीचा अंदाज घेत सेनीटायझर, माक्स वापर करत त्यांना सुरक्षित गावात प्रवेश देत होते. गावात येणार्‍या नागरिकांची कुठून आला,कोणाकडे चालला, अशा प्रकारची दररोजची लेखी नोंद हे पथक घेत होते. त्यामुळे गेल्या लाटेमुळे ग्रामीण भागामध्ये कोरोंनाचा शिरकाव अगदी अल्प प्रमाणात दिसत होता. परंतु आजची परिस्थिति पाहता कोरोंना हा ग्रामीण भागातच जोराने वाढत आहे. या प्रकरणाकडे आरोग्य यंत्रणेने वेळेत लक्ष दिले पाहिजे पूर्वी प्रमाणे टिम तयार करून गावाच्या मुख्य प्रवेशावर कार्यरत केली पाहिजे तरच ग्रामीण भागातील कोरोंना रोखण्यास मदत होऊ शकते.

पोलिस यंत्रणेचे दुर्लक्ष
शहरात सोशल डिस्टनचा पालन केले जात नाही नेमून दिलेले पोलिस यंत्रणा आपल्या स्वतःच्या तंद्रीत असते मित्रत्वाचे नाते तयार करत नेमून दिलेल्या कामाकडे दुर्लक्ष करत आपली मैत्री अबाधित ठेवत कायद्याला बाजूला सरकवत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या मनात पोलिसांन बद्दल आदरयुक्त भीती न दिसल्याने जो तो नागरिक आपल्या दिलेल्या नियमांचे उल्लघन करीत शहरात बिनधास्त काही काम नसताना फिरत असतात परंतु कारवाही होत नसल्याने नागरिक बिनधास्त आहेत. त्यामुळे तूफान गर्दी निर्माण होते.



ग्रामीण भाग कोरोंनाचा हॉसपॉट
आताच्या लाटेमध्ये ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत. याकडे प्रशासन का दुर्लक्ष करत आहे हे देखील गुलदस्तच आहे. काल पर्यंत म्हसळा तालुक्यात कोरोंना बधितांची एकूण संख्या 472 येवढी  आहे तर 7 तारखेच्या कोरोंना बाधितची संख्या 4 वाढीव आहे एकूण उपचारकरिता बधितांची संख्या 54 आहे. आजपर्यंत मृत्यू पावलेल्या व्यक्तीची संख्या 19 आहे. तर बरे झालेल्या व्यक्तीची संख्या 399 आहे. त्यानुसार 54 आताच्या रुग्णांमधील home isolation 35 रुग्ण आहेत. तर जिल्हा उपरुग्णालय श्रीवर्धन याठिकाणी 9 रुग्ण आहेत. तर माणगाव उपजिल्हा रुग्णालय येथे 5 रुग्ण उपचार घेत आहेत. तर खाजगी रुग्णालयात 5 रुग्ण उपचार घेत आहेत. अशा प्रकारे हे 54 रुग्ण सध्या या पद्धतीने उपचार घेताना दिसत आहेत. मात्र कोरोंनाची साखळी तोडण्यास अजून म्हसळा प्रशासनास का येत नसावे ही चिंताजनक बाब आहे.


अकरा नंतर काही टपरी दुकाने पोलिसांच्या मर्जितील चोरीचुपके पद्धतीने सुरु असतात त्याच दुकानात पोलिसच ग्राहक असतात हेच काय अवैध्य गुढका देखील विकला जातो ते देखील पोलिंसाच्या समोर अशी परीस्थिती निर्माण झाल्याने पोलिस यंत्रनेवर नागरिक नाराजीचे सुर उमठत आहेत.


म्हसळा तालुका कोरोंनाला घाबरत नाही का अशा प्रकारचे वातावरण शहरात दररोज पहण्यास मिळत आहे म्हसळा वगळता श्रीवर्धन, महाड, बोर्ली, रोहा यांनी चांगले निर्णय घेऊन कोरोंना साखळी रोखण्यास पुढे सरसावत आहेत. परंतु म्हसळा तालुका दररोज गर्दीच करत आहे. म्हसळा शहरात नगर पंचायत फवारणी का करत नाही या पूर्वी फवारणी केली जात होती तसेच म्हसळा तालुका सर्वांना एकत्र येवून कोरोंनाची साखळी तोडण्यास योग्य निर्णय घ्यायला हवेत जिवा पेक्षा आणखी प्यारे काय त्यामुळे आता तरी प्रशासनाने जागे व्हावे
-मा. नगराध्यक्ष, दिलीप कांबळे

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा