म्हसळा (वार्ताहर)
म्हसळा तालुक्यातील खामगाव विभाग हा सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट ठरू लागला आहे. तालुक्यातील इतर गावांच्या तुलनेत खामगाव विभागात जास्त रुग्ण सापडत आहेत.मागील कित्येक दिवसात प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये म्हसळा तालुक्यात खामगाव मध्ये कोरोनाचे अनेक रुग्ण सापडले आहेत.रोजच्या रोज खामगाव मध्ये रुग्ण सापडत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.प्रशासनाने गेल्या वर्षभरात लावलेले लॉकडाऊन, केलेल्या उपाययोजना आणि जनजागृतीमुळे कोरोना बाधितांचा वाढता वेग नियंत्रणात आणला होता. मागील काही महिन्यात म्हसळा तालुक्यात कोरोनाचा आकडा शून्य होता.यामुळे कडक असलेले निर्बंध प्रशासनाने शिथिल केले होते. त्यात कोरोना लसीकरणही तालुक्यात सुरू झाल्याने कोरोनाचा प्रसार संपला अशा भ्रमात नागरिक वावरू लागले होते. मास्क न घालने, बाजारपेठेत खरेदी साठी गर्दी करणे,लग्न सभा समारंभात गर्दी करणे, कोरोना नियमावलीला फासलेला हरताळ या मुळे आटाेक्यात आलेला रुग्णवाढीचा वेग पुन्हा वाढला आहे.मागील आलेल्या कोरोना लाटेत खामगाव विभागात रुग्णसंख्या मोजकीच होती.परंतु या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य विभागाच्या वतीने खामगाव पीएचसी मध्ये लसीकरण चालू केले आहे.
Post a Comment