देशात व राज्यात कोरोनाची महामारी असताना राजकारणापेक्षा रुग्णसेवेला महत्त्व देऊ.-नंदू शिर्के

फोटो -म्हसळा तालुका शिवसेनेतर्फे ग्रामिण रुग्णालय म्हसळा येथीलरुग्णांसाठीऑक्सि जन मशीन भेट देताना शिवसेनेचे तालुका  पदाधिकारी 


म्हसळा प्रतिनिधी
कोरोनाचा वाढता प्रभाव आणि दिवसें दिवस भासणारी ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेता म्हसळा तालुका शिवसेना संघटनेच्या माध्यमातून रोहा तालुका शिवसेना प्रमुख समिर शेडगे यांनी म्हसळा ग्रामिण रुग्णा लयासाठी एक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरभेट दिला. त्याचा लोकार्पण सोहळा आज दिनांक 20 मे 2021 रोजी म्हसळा तालुका माजी शिवसेना तालुका प्रमुख नंदू शिर्के, जि. प. चे माजी विरोधी पक्षनेते सुभाष करडे,शहर प्रमुख अनिकेत पानसरे, खारगाव सरपंच अनंत नाक्ती, सुरेश कुडेकर, कांतीशेठ जैन,गजानन शिंदे, अभय कळमकर,अक्रम साने,संतोष सुर्वे, डॉ.महेश मेथा,डॉ.अलंकार करंबे,डॉ.नदीम लोखंडे ग्रामिण रुग्णालयाचा कर्मचारी वर्ग आदि मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना माजी तालुका प्रमुख नंदू शिर्के यांनी सांगितले कि देशात व राज्यात कोरोनाची महामारी असताना राजकारणा पेक्षा आपण रुग्णसेवेला मदत देणेआवश्यक आहे.तालुक्यात सध्या खामगाव आणि वरवठणे ही  कोरोनाची हॉटस्पॉट आहेत. अनेक नामवंत सामाजिक कार्यकर्त्यांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले, परंतू आम्ही प्रयत्नांची पाराकाष्ट करून याच्यावर बऱ्याच प्रमाणात अंकुश ठेवला असून,येणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजन ची कमतरता भासू नये म्हणून रोहा शिवसेना तालुका प्रमुख समिर शेडगे यांच्या कडून नंदू शिर्के यांनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर  मशीन भेट मिळवून ती ग्रामिण रुग्णालयास लोकार्पण केली.यापुढे ग्रामिण रुग्णालयास लागणारी मदत आम्हीआमच्या परीने निश्चितपणे मिळवून देऊ असेही या वेळी नंदू शिर्के यांनी सांगितले.माजी विरोधी पक्षनेते सुभाष करडे यांनी ग्रामिण रुग्णालयातील सर्व डॉक्टर, सहकारी आणि कर्मचारी वर्गाचे कौतुक करताना सांगितले कि या रुग्णालयात अतिशय कमी कर्मचारी वर्ग व यंत्रणा असताना कोरोना बाबतीत अतिशय उत्कृष्ठ अशी कामगिरी करून  आपापली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडत असल्याचे सांगितले.

कोव्हिड रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर फायदेशीर आहे 
कोव्हिडच्या काळात प्राणवायूच्या प्रत्येक थेंबासाठी रुग्ण व्याकूळ असतात.त्याच वेळी रुग्णांचे नातेवाईक ऑक्सिजन मिळव-ण्यासाठी जीवाची शर्थ करीत फिरतात पण,ऑक्सिजन सिलेंडर मिळत नाहीत. याच वेळी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर रुग्णाचे जिव वाचवतो.





Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा