सुक्या मच्छीला खवय्यांची अधिक पसंती. अघोटीसाठी महीलावर्ग लागले तयारीला



तळा : किशोर पितळे

सध्या कोरोना महामारीचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर होत असल्याने देशात सर्वञ खरेदी विक्री वर बंदी घालण्यात आली आहे. सकाळी ७ते११ या वेळेतच दुकाने उघडी आसुन खरेदी विक्री करताना गर्दी होऊ नये म्हणून बंधने घातली गेली आहेत. महिला वर्गाला मात्र अघोटीचे पावसाळ्यासाठी साठवणूक करण्यात गुतंले असुन पापड, मसाले, गहू, तांदूळ, कडधान्ये बरोबर मांसाहारी वर्ग सुकी मच्छी भरण्यासाठी सुकी मच्छी दुकानात गर्दी केली जात आहे. संचारबंदी लगत लाँकडाऊन असल्याने दळणवळणाची साधने उपलब्ध नाहीत.तरी देखील खाजगी वाहनातून बाजारपेठेत ग्राहकांचीगर्दी होतआहे ग्रामीण भागात पावसाळ्यासाठी सुकी मच्छीसाठवणूक मोठ्याप्रमाणावर केलीजाते. ओली मच्छीला बंदी असते व प्रजननकाळ असल्याने मच्छी मिळत नसल्याने ग्रामीण भागातील मांसाहारी वर्ग सुक्या मच्छीला अधिक पसंती दिली जाते. सुकट, मांदेली,बारीक जवळा, अंबाडीसुकट, वाकटी सफेद, वाकटी काळी, माकली, ढोमकी,बोंबील,बांगडा याची मागणी वाढली असून माल मिळतनसल्याने किरकोळव्यापारी अडचणीसापडलाआहे घाऊक व्यापारी चढ्या विक्री करीत आहेत.
अंबाडी सुकट ४००-५००
बारीक सुकट १५०-२००
बोंबील ३००-५०० 
सोडे १५००-१७००
बगी ३००-५००
मांदेली २००/
असे प्रतिकिलो दरअसूनआवक वाढली आहे. मागील वर्षापेक्षा भाव वाढले असले तरी खवय्ये मात्र आपली तजवीज करताना दिसत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा