म्हसळा - प्रतिनिधी
कोरोना प्रादुर्भावावर पुर्णपणे मात करण्यासाठी एक मेव उपाय म्हणजे लसीकरण करून घेणे होय,या कामी महाराष्ट्र शासनाने सर्वत्र मोठया प्रमाणात प्रचार,प्रसार आणि व्यवस्था कार्यान्वित केली आहे.जनतेने त्याचा लाभ घ्यावा यासाठी शासनस स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत.रायगड जिल्ह्यात कोरोनाचे समुळ उच्चाटन करण्याकामी मा.जिल्हाधिकारी रायगड अलिबाग निधी चौधरी यांचे निर्देशानुसार जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांचे सहकार्याने आणि ओम गगनगिरी हॉस्पिटल नवी मुंबईच्या वतीने म्हसळा तालुक्यात मोबाईल व्हॅनसह वैद्यकीय पथकाच्या सहकार्याने दि.25 मे 2021 पासून लसीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली.म्हसळा न्यु इंग्लिश स्कूलमध्ये मोफत लसीकरण कार्यक्रमाला तालुका तहसीलदार शरद गोसावी,नायब तहसिलदार के.टी.भिंगारे, गटविकास अधिकारी वाय.एम.प्रभे,पुरवठा अधिकारी नथुराम सानप,संबंधित वैद्यकीय अधिकारी,तलाठी शहा तात्या आणि लाभार्थी उपस्थित होते. जिल्ह्यातील पी.डी.एस.यंत्रणेशी संबंधित अधिकारी,कर्मचारी तसेच शासकीय यंत्रणेसोबत दिवसरात्र काम करणारे रास्त भाव दुकानदार,पेट्रोल,डिझेल पंप धारक,शिवभोजन चालक,तालुका शासकीय गोदामातील हमाल - माथाडी कामगार,एफ सी आय अधिकारी,कर्मचारी,अन्नधान्य वाहतूकदार त्यांचे वाहन चालक आणि इतर प्रतिनिधी यांचेसाठी विशेष मोहीम राबवून कोरोना प्रतिबंधित लसीकरणाचे काम सुरु झाले आहे.सदर लसीकरणाचा कार्यक्रम पुढील 10-15 दिवस पूर्ण जिल्ह्यात चालू राहील असे म्हसळा तहसीलदार शरद गोसावी यांनी माहिती देताना सांगितले.ही मोबाईल व्हॅन वैद्यकीय पथकासह दररोज एका तालुक्यात जाऊन संबंधित तहसीलदार यांचे पर्यवेक्षणाखाली लसीकरण मोहीम राबविणार असल्याचे सांगण्यात आले.
Post a Comment