मुरुड तालुक्यातील खारआंबोली ते आगरदांडा महामार्गाची दयनीय अवस्था.सा.बा.खाते निद्रिस्त.



तळा किशोर पितळे

दिल्ली मुबंई कँरिडोर रस्ता राष्ट्रीय महामार्ग असून या रस्त्याचे काम बड्या ठेकेदाराला दिले असून हे काम अर्धवट अवस्थेत आहे.मुरूड हे पर्यटन स्थळअसून अनेक पर्यटक येत असतात तर जेट्टी असल्याने व मोठ्या प्रमाणात विकास होत असल्याने जड अवजड वाहनांची सतत वर्दळ वाढली आहे. मुरुड तालुक्यातील खारआंबोली - आगरदांडा हे अंतर फक्त ३/४ कि. मी. आहे. या मार्गावर अनेक वाहने येत असतात तसेच पर्यटक देखील येत असतात वाहन चालकना मोठी कसरत करावी लागत आहे. ५०/६० मीटर लांबीचे भले मोठे खड्यातून कसरत करावी लागत आहे.उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मुरुड.खार आंबोली -आगरदांडा यारस्त्याला प्रचंड खड्डे पडले ले असून अनेक ठिकाणी ना दुरूस्त झाला आहे. मोठा अपघात घडण्याची शक्यता असून घटने नंतरच प्रशासन ठेकेदारावर कारवाई करणार का?पावसाळा जवळ येऊन ठेपला असताना हा रस्ता कधी होणार असा सवाल केला जातआहे. उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मुरुड.याकडे दुर्लक्ष केले जात आहे.सदर काम पावसाळ्यापुर्वी होणेअपेक्षीत असून संबधीत खात्याने लक्ष घालावे अशी मागणी वाहन चालक व स्थानिकांंकडून केली जात आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा