म्हसळा (वार्ताहर)
तौक्ते चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यात हाहाकार माजवला होता.अनेक ठिकाणी लोकांची घरे, गोठे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.या झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा करण्याकरिता म्हाडा सभापती विनोद घोसाळकर हे म्हसळा तालुक्याचा दौऱ्यावर आले होते.यावेळी त्यांनी खारगाव आणी खरसई येथील वादळात नुकसान झालेल्या घरांची पाहणी केली.त्यानंतर तहसीलदार शरद गोसावी यांची भेट घेऊन तालुक्याचा एकूण किती नुकसान झालं आहे याचा आढावा घेतला.नुकसान ग्रस्तांना नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे तसेच राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई सोमवारी रायगड जिल्ह्याचा दौरा करणार आहेत अशी माहिती विनोद घोसाळकर यांनी दिली.यावेळी जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, माजी जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, मा तालुका प्रमुख नंदू शिर्के, शहर प्रमुख अनिकेत पानसरे, संपर्क प्रमुख गजानन शिंदे, सुरेश कुडेकर, महिला आघाडीच्या निशा पाटील, बाळा म्हात्रे, दीपल शिर्के, हेमंत नाक्ती, रमेश डोलकर उपस्थित होते.
पाहा काय म्हणाले म्हाडा सभापती विनोद घोसाळकर
Post a Comment