टीम म्हसळा लाईव्ह
ताऊक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत रायगड समुद्रकिनार्यावर राहणार्या 7 हजार 866 नागरिकांचे स्थलांतरण करण्यात आले आहे. या चक्रीवादळामुळे रायगड जिल्हादेखील प्रभावित होणार असल्याने जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली आहे.
आज (16 मे) सात वाजेपर्यंत 2 हजार 499 नागरिकांचे स्थलांतरण करण्यात आले होते. तर पुढच्या तीन तासांत आणखी 3 हजार 988 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. 17 मे सकाळी 5 वाजेपर्यंत रायगड किनारपट्टीवरील एकण 7 हजार 866 नागरिकांचे स्थलांतरण पूर्ण झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ताउक्ते चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातदेखील त्याचा प्रभाव दिसणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची व वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्याच्या समुद्रकिनार्यावरील 62 गावे तसेच खाडी किनार्यावरील 128 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील समुद्रकिनारी राहणाऱ्या 7 हजार 866 नागरिकांचे स्थलांतरण झाले पूर्ण
"ताऊक्ते" चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारी राहणाऱ्या आतापर्यंत 7 हजार 866 नागरिकांचे स्थलांतरण पूर्ण झाले असून
तालुकानिहाय स्थलांतरित लोकांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे---
अलिबाग-605, पेण-193, मुरुड-1067, पनवेल-168, उरण-451, कर्जत-45, खालापूर-176, माणगाव- 1309, रोहा- 523, सुधागड-165, तळा- 135, महाड-1080, पोलादपूर- 295, म्हसळा- 496, श्रीवर्धन- 1158
या एकूण 7 हजार 866 लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
Post a Comment