बाबू शिर्के म्हसळा
गेल्या काही दिवसांपासून खामगाव विभागात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. तसेच कोरोनामुळे अनेक रुग्ण दगावले असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आजही खामगाव विभागात शेकडो रुग्ण आहेत. पण प्रशासन त्यांचा पर्यंत पोहचत नाही.त्यामुळे येणाऱ्या काळात खामगाव मध्ये कोरोनाचा विस्फोट होण्याची शक्यता आहे.या सर्व गोष्टीला स्थानिक प्रशासन जबाबदार असून एवढे होऊन सुद्धा ते कोणतेही उपाय योजना करताना दिसत नाहीत असा आरोप माजी तालुका प्रमुख नंदू शिर्के यांनी त्यांचा कार्यालयात पत्रकारांशी वार्तालाप करताना केला. खामगाव येथे लसीकरण चालू झाले आहे परंतु तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने आंबेत येथे लसीकरण चालू करण्यात यावे अशी मागणी प्रशासना जवळ करणार असल्याचे शिर्के यांनी सांगितले. तसेच खामगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन महिला डॉक्टर आहेत त्या संध्याकाळी लवकर घरी जातात. त्यामुळे रात्रीच्या वेळी येणाऱ्या रुग्णाचे हाल होत आहेत. वाढत्या कोरोना रुग्णामुळे जर आरोग्य विभागवार त्या रुग्णांना ठेवायला कुठे जागा नसेल तर खामगाव येथील मराठा समाज हॉल येथे तात्पुरते कोविड सेंटर उभे करावे अशी मागणी प्रशासनाकडे केली असल्याचे नंदू शिर्के यांनी पुढे बोलताना सांगितले.
Post a Comment