मेंदडी आदिवासीवाडीत पाणी पुरवठा सुरळीत चालु होण्यासाठी सभापती,उपसभापती यांनी करून दिली बोरवेलची दुरुस्ती.
म्हसळा -प्रतिनिधी
मोठ्या लोकवस्तीच्या मेंदडी ग्रुप ग्राम पंचायती मधील आदिवासी वाडीवर स्वतंत्र पाणी पुरवठा कामी पंचायत समिती म्हसळा मार्फत बोरवेलची सुविधा करण्यात आली आहे.ऐन पाणी टंचाईच्या वेळी बोरवेल (डंपिंग मशीन) बंद पडल्याने ती दुरुस्ती करणे कामी म्हसळा पंचायत समितीच्या सभापती छाया म्हात्रे,उपसभापती संदीप चाचले यांनी प्रत्यक्ष जागेवर उभे राहून त्यांचे निगराणीत बंद बोरवेलची डंपिंग मशीन पंचायत समिती मार्फत दुरुस्त करून घेतली आहे तसेच पाणी पुरवठा होतो की नाही याची खात्री केली आहे.लोकप्रतिनिधीत्व करताना लोकांना काम करण्याची दिलेली हमी सभापती,उपसभापती कृतीत आणत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करून त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे.या वेळी त्यांच्या समावेत मेंदडी ग्राम पंचायत सरपंच राजश्री कांबळे,ग्रा.पं.सदस्य काशिनाथ वाघमारे,लक्ष्मण वाघमारे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.तालुक्यातील अनेक गावांतील बोरवेल बंद पडलेल्या आहेत त्याही सभापती, उपसभापती यांनी लक्ष देऊन पंचायत समितीच्या मार्फत दुरुस्ती करून द्याव्यात अशी मागणी आता होवू लागली आहे.
Post a Comment