कोव्हीड केअर सेंटर साठी मराठा भवन देणार : नंदू शिर्के
संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा तालुक्यातील खामगाव विभाग हा सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट ठरू लागला आहे. तालुक्यातील इतर गावांच्या तुलनेत खामगाव प्रा.आ. केंद्राचे विभागात पॉझीटीव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण जास्त आहे. शासकिय अहवालानुसार म्हसळा तालुक्यात खामगाव प्रा.आ.केंद्राचे कार्य कक्षेतील खामगाव १५,कणघर १,भापट ६, पाष्टी २,घोणसे १, सोनघर १ व आंबेत येथील १ असे २७ रुग्ण आज अँक्टीव्ह कोरोनाग्रस्त आहेत.या सर्वाचा आभ्यास करून नंदू शिर्के यानी मा.मुख्यमंत्री,आरोग्य मंत्री व जिल्हाधिकारी रायगड याना एक निवेदन देऊन खामगाव प्रा.आ.केंद्राचे कार्यकक्षेतील वाढत्या कोरोना रुग्णसंखे बाबत खंत व्यक्त करून स्थानीक प्रशासनाला सहकार्याची भावना व्यक्त केली आहे.त्याच बरोबरीने आरोग्य विभागाने सेवा देताना पारदर्शक द्याव्या अशी मागणी केली आहे. आवश्यकता वाटल्यास खामगाव येथील मराठा भवनात कोव्हीड केअर सेंटर अथवा विलगीकरण केंद्र सुरू करावे असे स्पष्ट म्हटले आहे.
तालुक्यात खामगाव प्रा.आ.केंद्राची व्याप्ती अन्य प्रा.आ.केंद्रांपेक्षा मोठी आहे,या केंद्रां तर्गत ४० गावे आणि सुमारे१८ ते १९ हजार लोकसंख्या येते, ४६अंगणवाड्या येतात, कोरोना सारख्या संर्सगजन्य आजाराला आळा घालण्यासाठी सामाजिक रोगप्रतिकार शक्ती (Herd Innumitory) वाढविणे गरजेचे आहे त्यासाठी सर्वांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. खामगाव,वावे आणि संदेरी ह्या तीनही उपकेंद्रातून भविष्यात लसीकरण सुरु व्हावे अशी मागणीही शिर्के यानी केली आहे.
सार्वजनिक आरोग्य विभाग व आम्ही खामगावकर पंचक्रोशीतील मंडळी " आपले आरोग्य,आपली जबाबदारी .. निरोगी राहण्यासाठी घेऊ खबरदारी .. "या मा. मुख्यमंत्री महोदयांचे उक्ती प्रमाणे कृतीत उतरु या .
नंदू शिर्के, माजी तालुका प्रमुख , म्हसळा
Post a Comment