बी-बियाणे प्रक्रिया माहिती अभियान
प्रतिनिधी. दिनेश पाटील भरडोली
रायगड जिल्हयात सन २०२१-२२ मध्ये खरीप हंगामात मुख्य भात पिकाची लागवड सर्व तालुक्यामध्ये करण्यात येते. काही शेतकरी भात पिक लागवडीकरीता घरगुती बियाणे वापर करतात.
या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हयातील सर्व तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक यांनी घरगुती बियाणे उगवण क्षमता चाचणी व बीजप्रक्रिया याबाबतच्या प्रात्यक्षिकांचे आयोजन तालुक्यातील सर्व गावांमध्ये करावे, या प्रात्यक्षिकांद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशा सूचना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणखेले यांनी जिल्ह्यातील कृषी विभागाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना दिल्या होत्या.
त्याच अनुषंगाने मौजे भरडोली गावात बी-बियाणे अभियान राबविण्यात आला. शेतकरी वर्गाला घरगूती बी-बियाणे कशा प्रकारे वापर करावयाचा आणि कोणती प्रक्रिया करून योग्य खत देऊन पेरणी करण्यास उपयुक्त करावा.बी-बियाणे पेरणी करून मोट्या प्रमाणात पिक कसे घ्यायचे तसेच पेरणी कशा प्रकारे करावी त्या संदर्भात संविस्तर माहिती शेतकरी वर्गाला मिळावी त्या अनुषंगाने एक लहानशा अभियान राबविण्यात आला होता. कार्यक्रमाला उपस्थित कृषि विभाग अधिकारी श्री. निंबारकर साहेब, कृषि मंडळ अधिकारी श्री. कुंभार साहेब, कृषि सहाय्यक अधिकारी श्री.अमोल घाडगे साहेब, कृषि सहाय्यक अधिकारी श्री.यांणगर साहेब पंचायत समिती श्रीवर्धन सदस्य श्री. मंगेश कोमनाक, गाव अध्यक्ष श्री. भिकु कोमनाक, श्री. रमण चिमण उपसरपंच श्री. जननाथ फडणीस आणि सर्व शेतकरी बांधव व महिला वर्ग उपस्थित होते.
रायगड जिल्ह्याच्या शेतीच्या कामाला जोर धरला आहे. त्यातच श्रीवर्धन तालुक्यात देखिल शेतीच्या कामाला सुरुवात झाली आहे.
Post a Comment