बाजारपेठेतील गर्दी टाळा अन्यथा लॉकडाऊन करावा लागेल, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज - पालकमंत्री आदिती तटकरे


म्हसळा बाजारपेठेतील गर्दी टाळा अन्यथा लॉकडाऊन करावा लागेल,प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज  - पालकमंत्री आदिती तटकरे 

"म्हसळा तालुक्यात कोरोना बधितांची संख्या वाढत असल्याने पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केली तिसऱ्या लाटेची भीती"

बाबू शिर्के : म्हसळा

कोरोना प्रादुर्भावावर मात करण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत व सहकार्य करीत असताना म्हसळा तालुक्यातील नागरिकांकडुन हवा तसा सहकार्य व प्रतिसाद मिळत नसल्याची खंत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याचे आयोजित कार्यक्रमात व्यक्त केली.म्हसळा तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना बधित रुग्णांची संख्या वाढत आसुन आज रोजी 68 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत.तालुका शहरात लसीकरण करून घेण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळत नाही,बाजरपेठेत नागरिकांची मोठया प्रमाणात गर्दी पहायला मिळत आहे,आजूनही लोक मास्कविना फिरताना दिसतात यावरून तालुक्यात कोरोनाची भीती संपली की काय असा वातावरण निर्माण झाला आहे.कोरोनाला आळा घालण्यासाठी ही बाब फारच गंभीर आसुन तालुका तहसीलदार,गटविकास अधिकारी,नगर पंचायत मुख्याधिकारी यांनी गांभीर्याने घेऊन म्हसळा तालुका बाजरपेठेतील गर्दी वेळीच आटोक्यात आणली पाहिजे अन्यथा ना विलाजाने पुन्हा लॉक डाऊन करण्यास भाग पडेल असा इशारा पालकमंत्री आदिती तटकरे यांनी ग्रामीण रुग्णालय म्हसळा येथे 102 जननी सुरक्षा योजनेअंतर्गत रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा कार्यक्रमात दिला आहे.म्हसळा शहरात लसीकरण करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित केले पाहिजे.नगर पंचायतीच्या सर्वच नगरसेवकांनी रोज किमान 10 लोकांना लसीकरण करण्यासाठी सेवा द्यायला हवी अशी सुचना केली.लोकवस्तीच्या तुलनेत म्हसळा शहरातील लसीकरण खुपच अल्प प्रमाणात आसुन जर शहरातील नागरिक लसीकरण करून घेत नसतील तर नाईलाजाने लसीचा साठा तालुक्यातील ग्रामीण भागासाठी वर्ग करावा लागेल असा इशाराही पालकमंत्री महोदयांनी सर्वांसमोर पक्षाचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांना दिला.कोविड प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि तत्पर रुग्णसेवेसाठी रायगड जिल्हा पालकमंत्री ना.आदिती तटकरे सातत्याने सक्रिय व पाठपुरावा करीत आहेत.दिनांक 29-5-2021 रोजी पालकमंत्री म्हसळा तालुक्याच्या दौऱ्यावर आल्या असता प्रथम त्यांनी म्हसळा तालुक्यातील चिखलप आदिवासीवाडी येथे उपस्थित राहून रायगड जिल्हा परिषद व स्वदेश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फिरते लसीकरण व्हॅनचे उदघाटन केले त्याच बरोबर म्हसळा ग्रामिण रुग्णालय आणि खामगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध करून दिलेल्या "102 जननी सुरक्षा अंतर्गत रुग्णवाहिकेचे त्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आल्या.या वेळी त्यांचे समावेत  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, प्रांताधिकारी अमित शेटगे, तहसीलदार शरद गोसावी, पक्षाचे जेष्ठ नेते अलीशेट कौचाली, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बबन मनवे, तालुका अध्यक्ष समीर बनकर,सभापती छाया म्हात्रे, उपसभापती संदीप चाचले,माजी सभापती उज्वला सावंत,माजी सभापती नाझीम हसवारे,गट विकास अधिकारी वाय.एम.प्रभे,मुख्याधिकारी मनोज उकिर्डे,पी.आय.उद्धव सुर्वे,ग्रामीण रुग्णालय आरोग्य अधिकारी डॉ.महेश मेहता,प्र.टी.एच.ओ.डॉ. गायकवाड, डॉ.करंबे, मा.नगराध्यक्षा जयश्री कापरे,उपनगराध्यक्ष सुहेब हलदे, शाहिदभाई उकये,सतीश शिगवण,अनिल बसवत, संतोष नाना सावंत, किरण पालांडे, भाई बोरकर, प्रकाश गानेकर, सुनिल महाडिक,स्वदेश फाउंडेशनचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.पालकमंत्री आदिती तटकरे यांनी ग्रामीण भागातील लसीकरण मोहिमे बाबत समाधान व्यक्त करताना वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी लसदात्यांना लस दिल्या नंतर त्यांना घ्यावी लागणारी काळजी आणि त्याचे महत्व पटवून सांगितले पाहिजेत अशा सुचना केल्या.दोन दिवसांत म्हसळा ग्रामीण रुग्णालयात कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात येणार असून येथे 10 ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.त्या कामी पालकमंत्री तटकरे यांनी म्हसळा ग्रामीण रुग्णालयाची पहाणी करून अन्य सेवा सुविधांबाबत जिल्हा शल्य चिकित्सक व तालुक्यातील आरोग्य अधिकारी यांना सुचना केल्या आहेत.मंत्री आदिती तटकरे दिनांक 31 मे रोजी म्हसळा ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन व्हेंटिलेटर बेडचे उदघाटन करण्यासाठी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा