शब्द संकलन पत्रकार श्री मधुकर रिकामे
जांभूळ.... डोंगर माथ्याच्या पायाशी असलेलं कोकणातील टुमदार गाव. गावात विविध समाजाचे लोक गुण्यागोविंदाने राहत असून
जांभूळ गावाचे ग्रामदैवत जांभूळजाई देवी आहे. गावातील तिन्ही समाज (गवळी कुणबी आणि बुद्ध समाज ) गुण्या गोविंदाने नांदत आहेत. गावाचा स्वतंत्र्य ग्रामपंचायत आहे प्राथमिक विद्यामंदिर आहे. गावात जिल्हा परिषदेची शाळा असून 7 वी पर्यंत वर्ग आहेत. गेली 35 वर्ष गावातील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होत आली आहे. बिनविरोध पॅनल निवडली जात असल्यामुळे गावात कुठल्याही प्रकारचा राजकीय वाद नाही.
जांभूळ गावामध्ये प्राथमिक आरोग्यकेंद्राची देखील सोय आहे. तिन्ही वाड्यामध्ये समाज मंदिर आहेत अत्यंत विलोभनीय निसर्ग सौंदर्याने नटलेले जांभूळ गाव तालुक्यात प्रसिद्ध आहे. गावातील देवराई मध्ये संपूर्ण गावाचं आराध्य दैवत ग्रामदैवत जांभूळ जाईचे सुंदर देऊळ असून गावाच्या प्रथम दर्शनी श्री रामभक्त पवन्नसूत हनुमान बजरंग बली चे सुंदर मंदिर आहे. तिथं नियमित प्रार्थना पूजा अर्चना केली जाते दर शनिवारी सामूहिक आरती केली जाते. तसेच गावातील तरुणवर्ग अत्यंत सुशिक्षित असून उच्चशिक्षित आणि निर्व्यसनी आहेत. गावामध्ये आदरणीय तीर्थरूप श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांची बैठक असून आठवड्यातून दर मंगळवारी निरूपण असते ( सध्या लॉक डाऊन मुले बंद आहे) श्री समर्थ कृपेनें जांभूळग्रामपंचायत गाव तंटामुक्ती आणि महात्मा ग्राम स्वच्छता अभियान यो दोनीही पारितोषिक प्राप्त आहे. गावातील बायकांचा डोक्यावरील हंडा कायमचा उतरला असून घरोघरी नळाने स्वच्छ पाणी पुरवठा प्रशासना मार्फत होत आहे. गावातील अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रेट आणि पेवरब्लॉक आहेत. तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून गावातील कृतिशील कात्यकर्त्यांनी मेहनत करून मंत्रालयात फेऱ्या घालून फोल्लोअप करून राजकीय पक्षांची मदत घेऊन सुंदर असा डांबरी रोड करून घेतला आहे.
खूप ब्रॉड असा 2 किलोमीटर रस्ता मुख्य मुंबई म्हसळा श्रीवर्धन रोड पासून उजव्या sidela आत आहे 1.5 km, गवळ वाडी कुणबी वाडी आणि 2 km बुद्धवाडी आहे अशा तर्हेने जांभूळ गाव जरी तिन्ही समाजाचा असला तरी अतयंत शांततेने गुण्या गोविंदाने खेळीमेळीच्या वातावरणात एकमेकांच्या सुखदुःखात एकमेकांना मदत करीत राहत आहेत जणू काय एक कुटुंबातील सर्वजण एक परिवार अत्यंत प्रेमाने राहत आहेत त्याच,आतापर्यंत गावात ग्रामपंचायत ची ना झालेली निवडणूक ही आहे बिनविरोध गेली पस्तीस वर्षे ग्रामपंचायत चा कारभार आहे विकासासाठी झटणारे कार्यकर्ते गावात आहेत संपूर्ण तिन्ही वाड्यांची जांभूळ ग्रामविकास समन्वयसेवा समिती स्थापन झालेली आहे तिच्या माध्यमातून विकास कामे केली जातात. अश्या या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या जांभूळ गावास नक्की भेट द्या.
-शब्द संकलन पत्रकार श्री मधुकर रिकामे दैनिक रायगड नगरी, CEO आदित्य पब्लिसिटी and media services
Post a Comment