श्रीवर्धन प्रतिनिधी :- तेजस ठाकूर
मागच्या वर्षीच्या चक्रीवादळाने सर्व नागरिकांमध्ये घबराहट निर्माण झाल्याने यावर्षी देखील तौक्ते वादळाची भीती नागरिकांमध्ये पसरली होती. दि. १६ व १७ मे रोजी झालेल्या वादळात कोणाचीही श्रीवर्धन तालुक्यात हानी झाली नाही. मागच्या वर्षीच्या तुलनेत काही अंश देखील नुकसान न झाल्याचे आढळून आले.
आमचे उद्दिष्ट प्राणी व पक्षी यांना वादळामध्ये जखमी झाल्यास त्यांना उपचार करणे व मानव जात कुठे अडचणीच्या ठिकाणी आढळून आल्यास त्यांना सुखरूप जागी नेणे. असे वक्तव्य सिस्केप महाडचे कार्यकारी सागर मिस्त्री यांनी केले. परंतु सुदैवाने कोणतीही हानी व नुकसान न झाल्याने त्यांनी समाधानाची भावना व्यक्त केली. सिस्केप महाडच्या पथकामध्ये ३० जवान तैनात होते. कोणतीही हानी नसतानादेखील त्यांनी श्रीवर्धन ते हरी हरेश्वर, बागमांडला, कोलमंडला, त्यासोबत भरडखोल, दिवेआगर अशी पाहणी केली सदरच्या पाहणीमध्ये कुठेही जखमी प्राणी पक्षी आढळून आले नाही.
श्रीवर्धन चे तहसीलदार सचिन गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कामकाज केले. उत्तम नियोजन व पूर्वतयारी असल्याकारणाने आम्हाला कार्य करण्यास कुठेही अडचण निर्माण झाली नाही. -सागर मेस्त्री (सिस्केप महाड कार्यकारी)
"मागच्या वर्षीच्या वादळात त्यांनी उत्तम प्रकारे कामकाज केला त्या उद्देशाने आम्ही त्यांना बोलावून घेतले व त्यांनी क्षणाचा विलंब न करता येथे हजर राहून रेस्क्यू करण्याची तयारी दाखवली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो." सचिन गोसावी (तहसीलदार श्रीवर्धन)
Post a Comment