पन्हळघर बुद्रुक (राम भोस्तेकर)
माणगाव उपजिल्हा रुग्णालय हे जिल्ह्यातील मध्यवर्ती रुग्णालय असून दक्षिण रायगड सह कोकणातील मंडणगड दापोली खेड या तालुक्यातील रुग्णांनादेखील या रुग्णालयाचा फायदा होत असतो,अश्यातच १०० बेड चे रुग्णालय असल्याने इलेक्ट्रिसिटीच्या अनेक अडचणी निर्माण होत असतात मात्र माणगांव मधील कर्तव्यदक्ष नागरिक इलेक्ट्रिशन संजय गांधी हे गेले अनेक वर्षांपासून रुग्णालयात निस्वार्थी पणे सेवा देत आले आहेत
वयाच्या ५८ व्या वर्षी देखील गांधी अविरतपणे काम करत आलेले आहेत गेल्या वर्षी कोरोना लॉक डाऊन परिस्थिती असूनही उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना रुग्ण आयसोलेशन विभागातील पंखे किंवा कनेक्शन दुरुस्ती ची कामे कशाचीही तमा व भीती न बाळगता पूर्णत्वास नेली,अश्या कामांमुळे खरे कोरोना योद्धा शब्दाला रुचेल असेच काम गांधी यांच्याकडून घडत आहे.
मागील वर्षी झालेले निसर्ग चक्रीवादळात रुग्णालयाचे अपार नुकसान झाले होते त्यावेळी देखील रुग्णांची कुचंबणा होउ नये याकरिता संजय गांधी यांनी पुढाकार घेत कामे केली,१७ मे रोजी आलेल्या चक्रीवादळमुळे अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने,कोविड लस साठवण गृह व रक्त साठवण गृहातील वीज पुरवठा खंडित झाल्याने या लसी व रक्तपिशव्या वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती मात्र यावेळी ही गांधी नी आपली कर्तव्यतत्परता दाखवत जनरेटर चालू करून सर्वकाही पूर्वपदावर आणले,अश्यातच उपजिल्हा रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या बोअरवेल चे कनेक्शन तुटल्याने रूग्णांना पाण्याची देखील गैरसोय झाली होती हे काम देखील गांधी यांनी माणगाव पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांच्या उपस्थितीत व नजरेसमक्ष करून दिले.
अश्या अविरतपणे उपजिल्हा रुग्णालयात कुठलाही संसर्ग होईल की वयाची तमा न बाळगता काम करणाऱ्या या कोरोना योध्याविरुद्ध अनेकांनी तक्रार अर्ज केले तरी देखील रुग्णालयात काम करणे हे पुण्याईचे काम आहे असे समजत गांधींनी कुठल्याही तक्रार अर्जाला न जुमानता निस्वार्थीपणे आपला कार्यभाग चालूच ठेवला आहे, संजय गांधी हे उपजिल्हा रुग्णालयात देत असलेल्या सेवेबद्दल माणगांव उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रदीप इंगोले, डॉ शांतीनाथ डोईफोडे, डॉ दीपक देशमुख यांच्यासह रुग्णालयातील विविध विभागातील कर्मचारी व माणगाव मधील सुजाण नागरिक यांनी गांधी यांचे आभार वजा कौतुक करण्यात येत आहे.

Post a Comment