कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काही बेडस् लहान मुलांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय
पन्हळघर दि.18( राम भोस्तेकर):- रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिचारिका अभ्यासक्रमासाठी बांधण्यात आलेल्या नवीन इमारतीत करोना रुग्णांसाठी कोविड सेंटर उभारण्यात आले आहे.
हे कोविड सेंटर पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत आज ( मंगळवार,ता.18) रोजी कार्यान्वित करण्यात आले.
यावेळी आमदार महेंद्र दळवी, अलिबाग नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती दिलीप भोईर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद गवई, तहसिलदार सचिन शेजाळ यांच्यासह जिल्हा रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
या कोविड सेंटरमध्ये 75 बेड असून या सेंटरमध्ये रुग्णांसाठी पुरेशी ऑक्सीजन व्यवस्था उभारण्यात आली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केलेल्या कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर या सेंटरमधील काही बेड्स लहान मुलांसाठीही राखून ठेवण्यात येणार आहेत. करोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव लहान मुलांवर पडण्याची शक्यता तज्ञ वर्तवित आहेत. यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले. तसेच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सीजन निर्मिती होत असून रायगड जिल्ह्यातून इतर जिल्ह्यांनाही ऑक्सीजन पुरविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
Post a Comment