श्रीवर्धन प्रतिनिधी:- तेजस ठाकूर
नैसर्गिक रित्या तौक्ते चक्रीवादळा निमित्त झालेल्या नुकसान ग्रस्त नागरिकांची समस्या समजून घेण्याचे कार्य मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांच्याकडून झाले आहे. त्यांनी रायगड जिल्ह्याच्या संपूर्ण आढावा घेतला. तसेच श्रीवर्धन तालुक्यातील दिघी, भरडखोल या बाजूला पाहणी करून नागरिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले व तातडीने शासनाला योग्यतेच पंचनामे सादर करावेत असे सांगितले.
पालकमंत्री आदिती तटकरे यांनी रायगड जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालये व स्मशानभूमी यांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. ते पंचनामे करून लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी व रायगड जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना भरीव मदत मिळावी असे मत व्यक्त केले.
विधानसभेचे आमदार अनिकेत तटकरे यांनी झालेल्या मच्छीमार कोळी बांधवांच्या नुकसानीचे पंचनामे ताबडतोब करण्यास सांगितले. त्यांचे प्रश्न मार्गी लावावे व नुकसानभरपाई लवकरात लवकर मिळेल असे आश्वासन नागरिकांना दिले. त्यासोबत पोल्ट्री व्यवसायीकांचे देखील पंचनामे करून घ्यावेत असे त्यांनी सांगितले त्याचबरोबर रायगड जिल्ह्याला राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक स्वतंत्र देण्यात यावी जेणेकरून आपत्तीच्या ठिकाणी पोहोचण्यास विलंब होणार नाही. असे प्रतिपादन आमदार अनिकेत तटकरे यांनी केले.
नुकसान झालेल्यांचे ताबडतोब पंचनामे करण्यात यावे, पंचनामे करताना योग्य ती खबरदारी घ्यावी, नुकसान न झालेल्यांचे पंचनामे करण्यात येऊ नये व योग्य त्या गरजू नागरिकांस नुकसानभरपाई मिळावी तसेच पुनर्वसन च्या दृष्टिकोनातून अनेक सुधारणा करण्यात येतील लवकरच पोल्ट्रीधार, मच्छीमार व गरजू नागरिकांना भरपाई मिळेल. राज्य शासनाकडून वीज प्रतिरोधक यंत्र बसवणे व भूमिगत वीज वाहिन्यांची कामे लवकरच सुरू होतील असे वक्तव्य मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.
हे शासन राज्यातील प्रत्येक नुकसान ग्रस्त व्यक्तीला हक्क व सोयी सुविधा मिळवून देईल. कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, नुकसान ग्रस्त व्यक्ती शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही असे त्यांनी म्हटले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या आढावा बैठकीचा अहवाल सादर करण्यात येईल तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः येत्या चार दिवसात कोकण दौरा करणार आहेत.
ही आढावा बैठक श्रीवर्धन मधील मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयांमध्ये झाली. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित होते. त्याचसोबत अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, पालकमंत्री आदिती तटकरे, विधानसभेचे आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार माणिक जगताप, श्रीवर्धन प्रांताधिकारी अमित शेडगे, श्रीवर्धन तहसीलदार सचिन गोसावी इत्यादी प्रशासकीय अधिकारी व इतर मंडळी उपस्थित होते.
Post a Comment