(म्हसळा प्रतिनिधी)
म्हसळा तालुक्यात ८१ गावे त्यांची लोक संख्या ६१ हजार ५४६ त्याना आरोग्य सेवा पुरविणारी यंत्रणा म्हणजे शहरातील एक ग्रामिण रुग्णालय आणि म्हसळा, मेंदडी व खामगाव अशी जिल्हा परिषदेची तीन प्रा.आरोग्य केंद्र, पाभरे येथील जि.प. दवाखाना अशी आरोग्य यंत्रणा कार्यरत आहे परंतु आज मितीला ही सर्व यंत्रणा गेले काही वर्ष अर्धवट आहे.राज्य व जिल्हा पातळीवरील आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांची ५०% पदे रिक्तआहेत. त्यामुळे संकल्प निरोगी महाराष्ट्रातील म्हसळयाचे आरोग्य कसे सदृढ होणार असा आसा सवाल अनेक सामाजिक कार्यकर्ते व शिवसेनेचे माजी ता.प्रमुख नंदू शिर्के यानी उपस्थित केला
जिल्हा परिषदेच्या प्रा.आ. केंदाममध्ये प्रामुख्याने औषध निर्माता (मिश्रक),आरोग्य सेवक (महिला व पुरुष), स्त्री परिचर, शिपाई अशा पदांची संख्या मोठया प्रमाणात रिक्त आहे.
म्हसळा येथे ग्रामिण रुग्णालय२०१४ पासून सुरू झाले असून तेथेही आरोग्य सेवे साठी अपुरा युतुर्थ श्रेणी कर्मचारी वर्ग, पुरेशा सुविधा व यंत्रणनसल्याचे सांगण्यात येते.
ग्रामिण रुग्णालय म्हसळयाला गेले ७ वर्ष कायमस्वरूपी अधिक्षक नाही."उप जिल्हा रुग्णालय श्रीवर्धन व ग्रामिण रुग्णालय जसवली अशा दोन ठिकाणी सेवा देणाऱ्या डॉ.मधुकर ढवळे यांच्याकडे म्हसळा ग्रामिण रुग्णालयचे अधिक्षक पदाचा अतिरीक्त कार्यभार दिल्याने म्हसळा ग्रामिण रुग्णालयाचे अस्थापनेवर कमी जास्त ताण होत असतो, म्हसळा ग्रामिण रुग्णालया साठी येणारी यंत्रसामग्री,अन्यत्र वळविली जाते. म्हसळा ग्रामिण रुग्णालयासाठी आलेल्या Bed माणगाव उपजिल्हा रुग्णालयासाठी देण्यात आल्या,तर उप जिल्हा रुग्णालय रोहा येथे २०१९पासून बंद असलेले एक्सरे मशिन एप्रिल २०२१ ला म्हसळा येथे आणले ते सध्या घूळ खात आहे, म्हसळा ग्रामिण रुग्णालयातील अनेक पदे अन्यत्र वळविली आसल्याचे समजते ती तात्काळ पूर्ववत आणावी अशी मागणी पुढे येत आहे
"म्हसळा ग्रामिण रुग्णालयामध्ये ऑक्सिजनच्या उपलब्धते सह २०-३० खाटांचे ‘डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर ’ (डीसीएचसी) सुरू करण्यात येणार आसल्याचे समजते ते नक्कीच कौतुकाचे आहे. पण म्हसळा ग्रामिण रुग्णालया
साठी कायम स्वरूपी अधिक्षक तात्काळ नेमावा ,म्हसळा तालुक्यातील आरोग्य संस्थाचा दर्जा,सोयी-सुविधा आणि आरोग्य सेवा बळकट कराव्या तसेच गरीब व्यक्तीं मध्ये जगण्याची आणि निरोगी आयुष्याची नवी उमेद निर्माण करण्याची संधी आरोग्य विभागाने घ्यावी"
नंदू शिर्के,मा.तालुका प्रमुख म्हसळा .
Post a Comment