किरण शिंदे / माणगाव
श्रीवर्धन तालुक्यातील नामांकित शिक्षण संस्था असलेल्या स्वर्गीय डॉ. ए. आर. हेंद्रे येथे कार्यरत असलेले दिलीप शंकर चेरफळे यांची राज्यातील नामांकित अविष्कार फाउंडेशन श्रीवर्धन तालुक्याचे सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
अविष्कार फाउंडेशन ही संस्था सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात निमशासकीय असून राज्यभर त्यांचे विभागीय घटक आहेत. मुख्य कार्यालय नेरळ येथे असून आबा पवार हे अध्यक्ष असून त्यांनी दिलीप चेरफळे यांची सचिव म्हणून निवड केली.
दिलीप चेरफळे हे माणगाव तालुक्यातील उणेगाव गावचे रहिवासी असुन ते बोर्ली पंचतन येथील डॉ. ए आर हेंद्रे आय सी एस सी दिल्ली बोर्ड शिक्षण संस्थेत गेली ३० वर्षे शिक्षक म्हणून काम करत असताना सलग ५ वेळा त्यांना या संस्थेकडून आदर्श शिक्षक म्हणून गौरवण्यात आले आहे. सामाजिक सेवेची अत्यंत आवड तसेच कला, क्रिडा, सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांचे योगदान ही उल्लेखनिय आहे. तरी अविष्कार फाउंडेशनने माझ्यावर दाखवलेल्या विश्वास मी नक्की सार्थकी लावेन आणि सर्वसामान्यांसाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे योग्य निवडीबद्दल विविध क्षेत्रातून त्यांचे कौतुक होत आहे.
Post a Comment