रायगड जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवे बरोबर ईतर दुकानांना दिवसभर चालू ठेवण्याची परवानगी!!
जिल्हाधिकारी यांचे पत्रक जारी!!!!
किरण शिंदे / माणगाव
कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात लॉकडाऊन आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकानांसह अन्य काही दुकाने १९ मे पासून पुर्णवेळ सुरू ठेवण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
रायगड जिल्ह्यात चक्रिवादळाचा मोठा फटका बसला आहे. अनेक घरांचे झाडे पडून मोडतोड झाली आहेत. लॉकडाऊन मुळे दुरूस्तीची कामे तसेच शेतीची कामे करण्यात अडथळा येऊ नये याकरीता अत्यावश्यक सेवेतील दुकानांसह अन्य काही दुकानांना पुर्णवेळ चालू ठेवण्याचे आदेश रायगड जिल्हाधिकारी यांनी दिले याबाबतचे एक पत्रक आज १९ मे रोजी जारी केले आहे. त्यानुसार किराणा, भाजीची दुकाने, फळ, विक्रेते, चिकन, मटन, मासळी, विक्रेते, रेशन दुकानदार फॅब्रिकेशन ची कामे करणारी अस्थापने शेतीची अवजारे व या संबंधीत दुकाने, पावसाळा पुर्वी करण्यात येणारी कामे आदी दुकाने दिवसभर चाली राहतील
तसेच सिमेंट पत्रे, ताडपत्री, विद्युत उपकरणे तसेच हार्डवेअर दुकाने निर्बंधातुन वगळण्यात आली आहेत. सध्या ही दुकाने सकाळी ११ चालू ठेवण्यात येत होती मात्र आता नविन आदेशानुसार पुर्णवेळ चालू राहणार आहेत.
Post a Comment