श्रीवर्धन प्रतिनिधी :-तेजस ठाकूर
सध्याच्या कोरोना महामारीमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शासनाने दिलेल्या आदेशांचे पालन करत एसटी महामंडळाने प्रवाशांच्या दळणवळणाची सेवा स्थगित करण्यात आली होती. जसे लॉकडाउनचे टप्प्याटप्प्यात अनलॉक होत जाते तसे एसटी सेवा महत्त्वाचे ठिकाणी सेवा देण्यास सुरळीत होते. "गाव तेथे एसटी" या एसटीच्या ब्रीदवाक्यानुसार खेड्यापासून शहरांपर्यंत नागरिकांना जोडण्याचे काम एसटी करते.
ह्याच पार्श्वभूमीतून बघता श्रीवर्धन आगाराने श्रीवर्धन बोर्ली पनवेल वेळ सकाळी ७:०० वाजता व पनवेल बोर्ली श्रीवर्धन सुटण्याची वेळ दुपारी १३:०० तसेच सकाळी ७:०० वाजता श्रीवर्धन बोर्ली नालासोपारा व नालासोपारा बोर्ली श्रीवर्धन सुटण्याची वेळ २२:०० त्याचसोबत दुपारी १३:०० श्रीवर्धन बोर्ली नालासोपारा व नालासोपारा बोर्ली श्रीवर्धन सुटण्याची वेळ सकाळी ०५:३० आणि सकाळी ०९:०० वाजता श्रीवर्धन साई मुंबई व मुंबई साई श्रीवर्धन सुटण्याची वेळ ०९:१५ अशा प्रकारे नवीन वेळापत्रकानुसार दिवसातून ४ ते ५ गाड्या श्रीवर्धन आगारातून प्रवासांच्या दळणवळणासाठी शासनाच्या आदेशांचे पालन करत सुरू केल्या आहेत.
"महाराष्ट्राची लालपरी पुन्हा प्रवाशांच्या सेवेमध्ये पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. श्रीवर्धन आगार सेवेसाठी सज्ज असून प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा." तेजस गायकवाड (रा.प. श्रीवर्धन आगार प्रमुख)
Post a Comment