तळा तालुक्यातील महागांव प्रा.आ.केद्राला रुग्णवाहीका दाखलपालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण.




तळा-किशोर पितळे 
ग्रामविकास,व आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून मिळालेल्या रूग्णवाहिकेचा  जिल्ह्याच्या पालक मंत्री अदिती ताई तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा ३० मे रोजीकरण्यात आला. यावेळी सभापती अक्षरा कदम,महीला बालकल्याण सभापती गीताताई जाधव यांच्या उपस्थितीत पार पडला.डोगराळ.दुर्गम भागातील महागांव जनतेसाठी रुग्णवाहिकेची अत्यंत गरजेचे होती ही तालूक्यातील तालूक्याच्या विकासासाठी खास.सुनील तटकरे, पालकमंत्री अदिती तटकरे,आम.अनिकेत तटकरे यांचे झुकते माप असते.या भागातील नागरिकांची मागणी पूर्ण झाली आहे.त्यामुळे या परिसरातील नागरिकांना लाभ मिळणार आहे. यावेळी गटविकास अधिकारी, विलास यादव,नायब तहसीलदार निलेश गवाणकर, अँड उत्तम जाधव,सचिन कदम, सरपंचा सुषमा कजबळे, नगरसेवक चंद्रकांत रोडे,तालूका वैद्यकीय अधिकारी डॉ. वंदन पाटील प्रा.आ.वैद्यकीय अधिकारी डॉ.अमोल बिरवाटकर ,डॉ.अस्मिता पाटील गणेश पवार,प्रवीण अंबार्ले आदि मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा