बारामती अँग्रोच्या वतीने म्हसळा ग्रामीण रुग्णालयात देण्यात आले ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर




म्हसळा - प्रतिनिधी

सामाजिक बांधिलकीतुन बारामती अँग्रोच्या वतीने आमदार रोहित पवार,संस्था सरचिटणीस राजेंद्र पवार यांच्या मार्फत रायगड जिल्हा खासदार सुनिल तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे आणि आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या सहकार्याने म्हसळा ग्रामीण रुग्णालयात कोव्हीड रुग्णांवर उपचारासाठी ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर भेट म्हणुन देण्यात आले.ग्रामीण रुग्णालयात संपन्न छोटेखाणी कार्यक्रमाला तहसीलदार शरद गोसावी,जिल्हा परिषदेचे सभापती बबन मनवे,सभापती छाया म्हात्रे,उपसभापती संदीप चाचले माजी सभापती उज्वला सावंत,तालुका अध्यक्ष समीर बनकर,वैद्यकीय अधिकारी डॉ.महेश मेहता,डॉ.श्रीमती करंबे,महसूल अधिकारी करचे,राष्ट्रवादी काँग्रेसचे गण अध्यक्ष सतीश शिगवण,अनिल बसवत,महिला अध्यक्षा रेश्मा कानसे,शहर अध्यक्षा शगुप्ता जहांगीर,युवक अध्यक्ष संतोष पाखड,दामोदर पांडव,संतोष नाना सावंत,किरण पालांडे,प्रकाश गाणेकर,मुबिन हुर्जुक,गजानन पाखड आदी मान्यवर उपस्थित होते.म्हसळा तालुक्यात कोरोना प्रादुर्भावाची दुसरी लाट सरता-सरता बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे.गरज भासल्यास किंवा अन्य वेळी गंभीर बाधितांना ऑक्सिजनची नितांत गरज भासते याच उद्देशाने पालकमंत्री आदिती तटकरे यांनी म्हसळा ग्रामीण रुग्णालयात कोव्हीड केअर सेंटर कार्यान्वित करण्याचे निश्चित केले आहे त्या नुसार आवश्यक ती साधन सामुग्रीची जमवाजमव सुरू असल्याचे डॉ.महेश मेहता यांनी माहिती देताना सांगितले.आता पर्यंत ग्रामीण रुग्णालयात 4 ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर भेट स्वरूपात प्राप्त झाले आहेत.याचा दुर्दैवाने कोणावर वापर करण्याची वेळ येवु नये पण ते वेळीच जवळ असणे आवश्यक असल्याचे डॉ. मेहता यांनी महत्त्व विषद केले.त्याच बरोबर रुग्णालयात जनरेटरची उपलब्धता होणार आहे.कोरोना लाट ओसरत असताना आज म्हसळयात एकाच दिवशी 13 रुग्ण सापडले आहेत त्या मुळे काळजी घेणे आणि सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.पालकमंत्री आदितीताई आणि त्यांचे पक्षाचे पदाधिकारी,पत्रकार यांनी ग्रामीण रुग्णालयात चांगली सेवा सुविधा मिळण्यासाठी विशेष लक्ष दिले असल्याचे सांगितले.नव्याने म्हसळा ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आसुन तीचे उदघाटन खासदार सुनिल तटकरे यांचे हस्ते करण्यात येणार असल्याचे तालुका अध्यक्ष समीर बनकर यांनी माहिती देताना सांगितले.कार्यक्रमाला उवस्थितांचे स्वागत वैद्यकीय अधिकारी डॉ.महेश मेहता यांनी केले व सर्वांचे आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा