श्रीवर्धन मधील प्रशासकीय यंत्रणेचे कौतुकास्पद काम



 योग्य नियोजन, अथक परिश्रम, झोकून देण्याची प्रवृत्ती व संघभावना

 श्रीवर्धन  प्रतिनिधी संतोष सापते

 आयुष्यात अनुभव हा अतिशय मोठा गुरू आहे असे नेहमीच बोलले जाते. गेल्या वर्षी 3 जुन ला निसर्ग चक्रीवादळाने अवघे श्रीवर्धन उध्वस्त केले. श्रीवर्धनला त्याची मूळ गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी  सामाजिक शैक्षणिक राजकीय आणि प्रशासकीय सर्व स्तरांमधून जोरदार प्रयत्न झाले. श्रीवर्धन सावरतय बहरतय आणि बागडतय असं वाटत असतानाच रविवारी तौक्ते  चक्रीवादळाची अस्मानी संकट पुन्हा एकदा श्रीवर्धन वरती कोसळले. दैव बलवत्तर म्हटलं तरी चालेल यावेळी श्रीवर्धन ला चक्रीवादळाचा  काही अंशी  फटका बसला. ताशी 45 ते 60 या वेगाने वारे वाहिले. श्रीवर्धन  तालुक्‍यातील 78 गावां मधील  जवळपास  832 घरे नुकसानग्रस्त झाले. समुद्राच्या किनाऱ्यालगत असणाऱ्या  जवळपास बाराशे लोकांना तालुका प्रशासनाने योग्य वेळी स्थलांतरित केले. प्रशासकीय यंत्रणेतील प्रत्येक अधिकाऱ्याची  कार्य कौतुकास्पद आहे. समाजाप्रती असणारे दायित्व, व त्या दायित्वच्या भावनेतून जोपासली जाणारी कर्तव्यनिष्ठ अतुलनीय आहे. गेल्यावर्षी निसर्ग  च्या पुढे सर्व काही नमले  होते मात्र यावेळी गेल्या वर्षीच्या कटू अनुभवातून, वर्तमान आणि भविष्याचा विचार करून योग्य आणि मार्मिक नियोजन करण्यात श्रीवर्धन तालुका प्रशासनाला यश आले. प्रांताधिकारी अमित शेडगे तहसीलदार सचिन गोसावी यांनी वादळाच्या काळात दोन दिवस तहसील कार्यालयात 24 तास बस्तान मांडले. बागमांडला ,हरिहरेश्वर ते बोर्लिपंचतन, दिघी या श्रीवर्धन तालुक्याच्या प्रत्येक मार्गांची क्षणाक्षणाची माहिती संकलित करण्यात प्रशासकीय यंत्रणा यशस्वी झाले.  निसर्ग चक्रीवादळाच्या वेळी इंटरनेट अभावी  सर्व दूरसंचार सेवा विस्कळीत झाली होती. यावेळी मोबाईल सेवा खंडित होणार नाही या दृष्टीकोनातून सकारात्मक पावले योग्य वेळी उचलण्यात आली.  मोबाईल टॉवर ला अतिरिक्त डिझेल साठा  उपलब्ध करून देण्यात आला.बीएसएनएल  ची घोषणा मात्र कागदावरच राहिली. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सर्व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने तालुक्यातील प्रत्येक रस्ता  वाहतुकीस योग्य ठेवण्यात प्रशासनाला यश आले. श्रीवर्धन पोलीस ठाण्यातील उपपोलीस निरीक्षक उमेन्द्र खिराड व दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांच्या टीम ने संपूर्ण तालुक्यात नेत्रदीपक कामगिरी केली. संदीप पोमण यांनी  सागरी किनाऱ्यालगत असणाऱ्या अनेक कुटुंबांना योग्य वेळी सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले. नैसर्गिक आपत्ती  किती स्वरूपात विध्वंस करणार कोण कोणती संकटे उभी करणार  याची कल्पना करणे सहजासहजी शक्य नाही पण मानवी प्रयत्नातून आपण केलेल्या अभ्यासातून आपण त्या संकटांना वरती मात करू शकतो. त्यांचा सामना करू शकतो आपल्या माणसांचे प्राण वाचवू शकतो हे . पुन्हा एकदा श्रीवर्धन मधील प्रशासकीय यंत्रणेने केलेल्या सुसज्ज, मार्मिक,  कौतुकास्पद व अभिमानास्पद नियोजनातून सिद्ध झाले आहे . समुद्र किनाऱ्याच्या लगत असणाऱ्या गावांना भविष्यात वारंवार चक्रीवादळात सारख्या नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्याचा प्रसंग निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याकारणे श्रीवर्धन तालुका प्रशासनाने यावे केलेली तयारी निश्चितच आपत्ती व्यवस्थापनातील मैलाचा दगड मानली जाईल हे निश्चित आहे. तहसीलदार सचिन गोसावी यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता उपजिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या दृष्टीने महत्वाचा असलेला ऑक्सिजनचा अतिरिक्त साठा तयार ठेवला तसेच वादळा पश्चात  विद्युत पुरवठा सुरळीत राहील या दृष्टिकोनातून महत्त्वाचे नियोजन केले .श्रीवर्धन नगर परिषदेचे मुख्याधिकारी किरण कुमार मोरे व गटविकास अधिकारी  उद्धव होळकर  यांनी वादळ पूर्वी नगर परिषदेच्या हद्दीतील व तालुक्यातील दरड प्रवण क्षेत्र  व समुद्राच्या किनारी असणारी वस्ती   या सर्व भागांची पाहणी करून संबंधित स्थानिक जनतेशी सुसंवाद साधला. त्यांना मानसिक आधार देत मानसिक बळ देत  त्यांची योग्य ठिकाणी त्वरित निवासाची व्यवस्था केली. व जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातील  धोकादायक ठरतील अशा झाडांच्या फांद्यांची  कापणी करण्यात आली.  सार्वजनिक बांधकाम खात्याच्या श्रीकांत गणगणे यांनी  आपल्या टीम च्या माध्यमातून तालुक्यातील सर्व रस्ते सुस्थितीत राहते याची दक्षता घेतली. श्रीवर्धन तालुका प्रशासनातील या सर्व तरुण अधिकाऱ्यांनी एकमेकांमध्ये समन्वय राखत संघभावनेने यशस्वीपणे तौक्ते चक्रीवादळा वर यशस्वीपणे मात केली . वादळ शमले  त्याच दिवशी तालुक्यातील  बहुतांशी भागातील    विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. महावितरणचे महिंद्र  वाघपैंजण यांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी प्रयत्नाची पराकाष्टा करत ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्यात यश मिळवले आहे.

 जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीवर्धन व म्हसळा तालुका प्रशासनाने   नियोजन केले. चक्रीवादळ संदर्भात सर्व सूचना प्राप्त झाल्या होत्या. तालुक्यातील रस्ते, वीज पाणी, आरोग्य या सर्व बाबींचा नियोजनात करत असताना विचार करण्यात आला त्यानुसार प्रशासकीय यंत्रणेने आपले काम पूर्ण केले.... अमित शेडगे ( प्रांत अधिकारी श्रीवर्धन )

 गेल्या वर्षीचा निसर्ग चक्रीवादळाचा अनुभव बरेच काही शिकवून गेला होता. चक्रीवादळा पूर्वी  प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज होती. सर्वसामान्य जनतेला कोणत्याही स्वरुपाची अडचण उद्भवणार नाही त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नशील होतो.  तौक्ते चक्रीवादळाचा काही अंशी फटका श्रीवर्धन तालुक्याला बसला आहे..... सचिन गोसावी( तहसीलदार श्रीवर्धन )

 चक्री वादळाची पूर्वसूचना असल्यामुळे शासकीय यंत्रणेने योग्य असे नियोजन केले. दरड प्रवण क्षेत्र व समुद्राच्या  किनाऱ्या लगत असणारी लोकवस्ती यांच्याशी संवाद साधला..... किरण कुमार मोरे  ( मुख्याधिकारी श्रीवर्धन नगरपरिषद )

जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार आम्ही चक्रीवादळ प्रसंगी काम केले आहे. प्रशासनातील सर्व घटकांमध्ये समन्वय असल्याने चक्रीवादळाचा यशस्वीपणे मुकाबला करू शकलो.  समुद्र किनाऱ्यालगत असणाऱ्या लोकांचे योग्य वेळी स्थलांतर करण्यात आले. प्रशासकीय यंत्रणेला जनतेकडून अतिशय चांगली साथ मिळाली... संदीप पोमन  ( सहाय्यक पोलीस निरीक्षक दिघी सागरी पोलीस ठाणे )

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा