तळा तालुक्यातील ग्रामीण भागात एस् टी सुरू करण्याची जनतेची मागणी.



 तळा किशोर पितळे

तळा तालुका डोंगराळ व दुर्गम असून जवळपास साठ पासष्ठ गाव खेडी आहेत. तळा तहसील कार्यालय असल्याने एस् टी दळणवळणाची एकमेव साधन असल्यानेतळा तालुक्यातील ग्रामीण भागातील एसटी फेर्‍या राज्य परिवहन महामंडळाच्या रोहा व माणगाव बस आगाराने सुरु कराव्यात अशी मागणी ग्रामीण भागातील प्रवासी वर्गातून केली जात आहे.मार्च महिन्यात कोरोनाची दुसरी लाट रायगड जिल्ह्यात जोरात पसरू लागल्याने परिवहन महामंडळाने शासनाच्या आदेशाकडे लक्ष देत एसटी फेर्‍या बंद केल्या होत्या.आता रायगड जिल्ह्यात रुग्ण संख्या कमी होत चालल्याने प्रशासनाने घालण्यात आलेले काही निर्बंध व अटी शासनाच्या आदेशाने जिल्ह्यात शिथिल केले आहेत.तळा तालुक्यातील बहुतांशी दुकाने आता सुरु झाली असून रोहा माणगाव बस आगारातून रोहा तळा बोरीवली (मुंबई),माणगांव तळा पनवेल या ठिकाणी जाण्यासाठी काही एसटी फेर्‍या सुरु करण्यात आल्या आहेत.तसेच माणगांव आगारातून माणगांव तळा रोवळा-बोरीवली सकाळी १० वा.व रात्री १० बोरीवली तळा रोवळा अशी नव्याने बस सूरू करावी अशी मागणी केली जात असून निश्चितच लाभ होईल. जर सुरू न केल्यास ग्रामीण भागातील जनता प्रवासाला येणार कशी?... मात्र अजून ग्रामीण भागातील एसटी फेर्‍या सुरु केलेल्या नाहीत. ग्रामीण भागातूनजनताशासकीय कामासाठी, छोटेव्यवसायिक  बाजारपेठेत येत असतात.तळा हे तालुक्याचे ठिकाण असून याठिकाणी पालक व विद्यार्थी तसेच नागरिक विविध कामानिमित्त येतात. तसेच छोटी मोठी नोकरी करणारे मुले-मुली शहरात व कामाचे ठिकाणी येत असतात.या सर्वांची एस् टी फेरी बंद असल्याने मोठी कुचंबना होत आहे.काही ग्रामीण भागातून खासगी अधिक भाडेखर्च करून यावे लागत आहे.त्यामुळे या लोकांना तालुका ठिकाणी यायचे कसे?जायचे कसे? असा प्रश्न पडला आहे. याकडे रोहा,माणगाव आगार प्रमुखाने लक्ष देऊन लोकांची होणारी कुचंबना थांबवून कोविड नियमांची सक्ती करीत ग्रामीण भागातील एस् टी फेर्‍या सुरु कराव्यात अशी मागणी प्रवासी वर्गातून जोर धरू लागली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा