संजय खांबेटे : म्हसळा
देशात व राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठा युध्द पातळीवर कामकाज सुरु आहे.covid 19 प्रादुर्भाव रोखण्या साठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दि. १३मार्च २०२०.पासून लागू आहे, त्याच प्रमाणे आपत्ती व्यवस्था पन अधिनियम २००५ लागू करून राष्ट्रीय आपत्ती घोषित करून" कोरोना " विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात युध्दपात ळीवर कामकाज सुरु असतानाही म्हसळा शहरांत व तालुक्यांत, सोशलडिस्टसींग, मास्कचा वापर या महत्त्वाचे नियमांकडे पोलीस ,नगर पंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत आहे या बाबत गर्दीसह अनेक वेळा वृत्तपत्रांत बातम्या प्रसीध्द झाल्या आहेत. याकडे पोलीस व प्रशासन दुर्लक्ष करीत आहेत. विविधस्वयंसेवी संस्था व स्थानिकांच्या मदतीने कोरोना " विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व गर्दी टाळ्यासाठी स्थानिक प्रशासनाने लक्ष देणे जरुरीचे असताना दुर्लक्ष होत आसल्याचे प्रसीध्दी माध्यमांत येत आहे.
"म्हसळा पोलीस स्टेशन हद्दींत देशी व वीदेशी दारुचे आनधीकृत धंदे मागील एक महिन्या पासून वाढले आहेत. तालुक्यातील मेंदडी, वारळ, रेवली, पाभरे, चिचोंडे, म्हसळा, चिखलप, खामगाव, तोराडी, वावे, कोळे या व अन्य भागांत सर्रास हातभट्टी ,देशी, विदेशी, दारुची अनधीकृत विक्री सुरु आहे.या बाबत अनेक वेळा जिल्हा दारूबंदी व पोलीस विभागाकडे तक्रारी सुद्धा झाल्या आहेत.
वाढत्या दारु सेवनाचे लसीकरणावर होत आहे दुष्परीणाम.
अनेक दारूपिणा-या लोकांच्या मनामध्ये एक प्रश्न सातत्याने सतावत आहे. अनेक नागरिक हे मोठ्या प्रमाणात दारू पितात. त्यामुळे त्यांनी जर कोरोनाची लस घेतली असेल तर त्यांनी त्यानंतर दारू पियावी का न पियावी या बाबत अनेक मत-मतांतरे असल्याने व या समस्येवर योग्य ती शासकीय प्रसीद्धी नसल्याने तालुक्यात लसीकरण मंद गतीने सुरु आहे आसा जाणकारांचा दावा आहे.
Post a Comment