आपल्या कोकणकन्येला आणि तिला साथ देणाऱ्या कोकणपुत्राला मानाचा मुजरा !!!!!


एक अभिनेता जो कलेचा पुजारी, उपासक, असा तो कलावंत. समाजाच्या मनोरंजनासाठी दिवस - रात्र झटणारा, वेळ पडलीच तर समाजउपयोगी कामात हिरीरीने भाग घेणारा, असा तो अभिनेता आज समाजावर आलेलं महाभयंकर संकट कोरोना, या महामारीत अनेक दानशूर माणस, संस्था आपल्याला जमेल तेवढी मदत करत आहेत. यात अभिनेत्यांचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे अशाच एका अभिनेत्याने समाज संकटात आहे याच भान ठेवून " स्वतः च लग्न कोरोना संपल्याशिवाय करायचं नाही" असा निश्चय केलाय.
तर ही गोष्ट आहे आपल्याच मराठी अभिनेत्यांची. त्याने मराठी सिनेमा, सिरीयल मध्ये काम केलच आहे, आणि हिंदी सिनेमांसृष्टीत आपली झलक दाखवली आहे. तो म्हणजेच
देवरुख रत्नागिरीतील " सिद्धेश लिंगायत".  जो आपल्याला “बारायन”, “प्रेमाचा कट्टा”, “बाजी”, “टाईम पास २”, “खारी बिस्किट”, “उनाड” या मराठी सिनेमांमध्ये आणि  “जागो मोहन प्यारे, लक्ष्य, ऐक नंबर, प्रेम हे, प्रिति परी तुझवरी, गाव गाता गझाली" या मराठी मालिकामध्ये झळकलाय.
तर आज कोरोनामुळे लग्न रद्द कराव लागलंय. आपल्याला प्रश्न पडलाच असेल मोठमोठे अभिनेते, अभिनेत्री लग्न करत आहेत मग हा अभिनेता का नाही करत लग्न???.......
कारण एकच आहे,त्याच्या होणाऱ्या पत्नीने म्हणजेच वधुने " आपण लग्न कधीही करू शकतो पण रुग्णसेवा हे माझ पहिल कर्तव्य आहे " असा जणु निश्चय केलाय.

ही वधू आहे तरी कोण?????
ती आपली कोकणकन्या "महेश्वरी मधुसूदन लिंगायत". महेश्वरी ही सिंधुदुर्ग जिल्यातील कासार्डे या छोट्याश्या गावातून बी. एस सी नर्सिंग करतेय. एक अभ्यासक्रमाचा भाग म्हणून तिला कोरोनाग्रस्त रुग्णांच्या सेवेसाठी 27  एप्रिल ला अपॉइंटमेंट लेटर आलं पण मे महिन्यात लग्नाची तारीख मग काय करायचं या दुहेरी विचारात असताना तिने आपलं कर्तव्य पार पाडायचं ठरवलं रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून तिने कोल्हापूर च्या अर्थयू हॉस्पिटलच्या कोविड सेंटर ला जॉईंट केलय.
तीच असं म्हणणं आहे कि " लग्न करून मला माझ्याच माणसांचे आशीर्वाद मिळाले असतें पण मला आज अनोळखी माणूस आशीर्वाद देऊन जातात हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. सिद्धेश आणि मी मनाने खूप जवळ आहोत लग्नगाठ ही आमच्यातली फक्त औपचारिक्ता आहे ती आता माझी कोरोनाची ड्युटी पूर्ण झाल्याशिवाय होणारच नाही. "
महेश्वरी भावुक म्हणते कि, " मी वयाच्या 20 व्या वर्षी वडिलांच छत्र हरवलं आई ने मला वडिलांची कमी भासू दिली नाही, माझ्या आयुष्यातल आई च प्रेम आणि बाबांचा पाठींबा या दोन्ही भूमिका आज ती करतेय 
पण मी माझ्या बाबा ना विसरू शकत नाही. आई भाऊ नवऱ्या पेक्षा मला बाबा खूप जवळचे वाटायचे. आज बाबा ना miss करतेय तस इतर कोणीही करू नये म्हणून मी या नर्सिंग क्षेत्रात आले. कोणाचाही जीव वाचवताना आपलाही त्यात खारीचा वाटा असावा असं मला नेहमी वाटत. रुग्ण जेव्हा बरे होऊन आशीर्वाद देतात तेव्हा मला नेहमीच माझ्या बाबांची आठवण येते आज ते जिथे असतील तिथे नक्कीच माझ्याबद्दल त्यांना अभिमान वाटत असेल."
लग्न झाल्यानतर सुद्धा रुग्ण सेवा हेच पहिलं माझं कर्तव्य आहे असं ती म्हणते या सगळ्यासाठी सिद्धेश चा खूप मोठा पाठिंबा आहे आज मला असा साथीदार मिळाल्यामुळे मी माझं कर्तव्य पार पाडतेय. 
अशा या आपल्या कोकणकन्येला आणि तिला साथ देणाऱ्या कोकणपुत्राला मानाचा मुजरा !!!!!


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा