दिव्यत्वाची जेथे प्रचीती तेथे कर माझे जुळती"निगर्वी व्यक्तीमत्व स्व.अशोकशेट लोखंडे.

"दिव्यत्वाची जेथे प्रचीती तेथे कर माझे जुळती" निगर्वी व्यक्तीमत्व स्व.अशोकशेट लोखंडे.

महाराष्ट्र जशी संताचीभूमी तशीचअनेक रत्न यामातीत जन्मालाआलीआहेत.त्यामुळे क्रांतिकारकामुळे क्रांती घडवून आली.त्याप्रमाणे रायगड(कुलाबा) जिल्ह्यात असे व्यक्तीमत्व तळगड किल्ल्याच्या कुशीत हिरा जन्माला आलाआणि क्रांती सुवर्णाक्षरांनी लिहूनठेवली ते निगर्वीव्यक्तीमत्व असलेले स्वर्गीय अशोकशेट लोखंडे

{८मे.२०२१--३३वा स्मृती दिना निमित्ताने खास लेख  किशोर पितळे पत्रकार तळा रायगड.}

तळा तालुक्यातील मालाठे गावी निसर्गरम्य, डोगंराळ टूमदार वजा द्रोणागिरी डोंगराच्या कुशीत ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबात १५जून१९४३जन्म लोखंडे परिवारात झाला. जीवनात अशा काही व्यक्ती जन्म घेतात आणी शेवटच्या क्षणापर्यंत हवा हव्याशा वाटत असतात असेच स्व.अशोक शेट यांच्याबाबतीत घडले प्राथमिक शिक्षण१ली ते ४थी रा जि प शाळा मालाठे व पाचवी ते सातवी शिक्षण रा.जि.प. मराठी शाळा तळाउच्च शिक्षण बी.ए. एल.एल.बी. पर्यंत मुंबई येथे पूर्ण केले. वडीलांचा नळबाजारात नारळाचा होलसेल व्यापाराची व्याप्ती मोठीअसल्याने त्या व्यवसायात १२/१२तास लक्ष घालीत होते.त्यामुळे प्रेम आदर निर्माण केला होता  पंरतु तो व वकिली व्यवसाय न करता समाजसेवा व व्यापार हे कार्यक्षेत्र समजूनलक्ष केंद्रित केले.गोरगरीब शेतकरी कुटुंबातील मुलंशिकली पाहीजेत हा त्याच्या ध्यास होता.त्यासाठी सदैव प्रयत्नशील होते. गावातील मुंलासाठी एस.टी.ची सोय केलीत्यांना शैक्षणिक सेवा सुविधा उपलब्ध करून परिसराचा विकास करण्यासाठी प्रयत्न केला.मालाठे गावातील एक वकील असल्याने देवासारखा मानीत होते  जिल्ह्यात थोरा मोठ्या चे आदरणीय स्थान झाल्याबद्दल सार्थ अभिमान होता  पाणी टंचाई असल्याने पाणी पुरवठा साठी १०%लोकवर्गणी स्वतः भरली .१९६३साली वयाच्या२०व्या वर्षी तळा पाणी पुरवठा कमिटी मुंबई येथे स्व.खंडेरावदेशमुख यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलीतळ्यामधून उमद्यातरुणाला सामाजिकविकास क्षेत्रातसामावून घेण्यात यावेअसानिर्णयझाल्यावर अशोकशेट यांची सेक्रेटरी पदी नियूक्ती करण्यात आली. त्यावेळी तळे विभाग सार्वजनिक विकास मंडळ स्थापन करण्यात आले.रक्तातच सामाजिक कार्याची उर्मी असल्याने विकास हाच ध्यास होता.अल्पावधीतच या हिऱ्याचे पैलू चमकू लागले होते कर्तृत्वाचा ठसाउमटू लागला सार्वजनिककार्यातसहभागी होत असतानाच राजकीय क्षेत्रात१९६४साली कै. केशव नारायण उर्फ भाई लोखंडे यांना जि.प.साठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली होती त्यावेळी त्यांच्या बरोबरीने श्री जनार्दन साळवी डॉक्टर श्रीनिवासवेदक,कै.बाळ शेट देशमुख आणिअशोकशेट खांद्याला खांदा लावून प्रचाराची धुरा सांभाळली होती.मुरब्बी राजकीय व्यक्तीमत्व.कै.डॉ.महादेव गं.जोशी पै.हसनभाई हसवारे,आयुबखान म्हैसकर,कै. नारायणराव मेकडे हे देखील प्रचार करीत होते.विरोधी पक्षाचे (शे.का.प.) कै.महादेवराव माणकर यांना २०००मतांंनी पराभव पत्कारावा लागला याचे सर्व श्रेय या शिलेदारांना दिले गेले.त्यात अशोकशेटचे राजकीय पारडे जड झाले  त्यानंतर तळा तालुका निर्मितीचे डोहाळे लागले होते. यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन पहिली सभा मुंबई येथे स्वातंत्र्य सैनिक स्व. प्रभाकरराव(दादा)देशमुख यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली. तालुका निर्मितीत सिंहाचा वाटा होता. १९७२/७३ च्या जि.प. निवडणूकीचे बिगुल वाजले आणी जेष्ट मंडळीच्या आग्रहा खातर सहकाऱ्यासह राजकारणात सहभागी झाले. एक सच्चा उमद्या कार्यकर्ता व अभ्यासू सामाजिक राजकीय क्षेत्रातील आवड ही वलये पाहून १९८०साली माणगांव-रोहा विधानसभा मतदार संघातकाँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली.विरोधी प्रतिस्पर्धी जनता पक्षाचे कै.. अशोकशेट साबळे यांच्याकडून १२०० मताची हार पत्कारावी लागली हे तळेवासीयांचे दुर्दैव होते.परंतू    पराभवानेखचून न जाता पुन्हाजोमाने राजकारणापेक्षा समाजकारण करू लागले.या युवा कार्यकर्ताची दखल पक्ष श्रेष्ठींनी घेऊनरायगड जिल्हा नियोजन समितीवर नियुक्ती केली. माणगांव तालुका संजय गांधी निराधार स्वावलंबन योजनाकमिटीचे अध्यक्ष झाले.१९८२साली कोकण विकास महामंडळ सदस्य झाले. पक्षात महत्त्वाची पदे पादाक्रांत केली.दिवसेंदिवस चंद्रकलेप्रमाणे आपले कर्तृत्व वाढत चालले होते इंदापूर-तळा-मांदाड- रोवळा हा राज्य महामार्ग होण्याच्या निमित्ताने बँ.अंतुले  यांची जवळीक झाली.पक्षाशी एकनिष्ठेने असल्याने स्व बँ. ए.आर.अंतुलेसाहेब सरचिटणीस असताना रायगड ते दिल्ली या मधील अशोकशेट महत्त्वाचा दुवा होते. कै. रवींद्र राऊत, अंतुले यांनी विश्वास असल्याने सक्रिय होते. त्यामुळे जीवनात मागे पाहीले नाही.त्यामुळे सामाजिकराजकीय क्षेत्रातकर्तुत्वाची कमान गगनाला गवसणी घालीत होतीयात मोठे वडीलबंधूश्री.वसंतशेट लोखंडे हिमालयासारखे पाठिशी होते. राम बलरामा सारखी ताकत व प्रेरणामिळाली लोखंडे कुटुंबियांनी मायेची पाखर दिली धर्म पत्नी श्रीमती अलका ताई यांची प्रत्येक बाबतीत साथ असल्याने हे शक्य झाले सातत्याने ते त्यांना म्हणायच्या मै तुम्हारे साथ हुँ। 

व त्याचे अनेक मित्रपरिवार,सहकारी यांच्या साथीला होते.दिलदार हसरे, निस्वार्थी, गोरेपान, देखणी शरीरयष्टी हाडाचा सच्चा कार्यकर्ता म्हणून रायगडात उदयाला आले. रायगड(कुलाबा) जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेस मध्ये स्वच्छ चारित्र्यवान प्रतिमा झाली होतीत्यामुळे विरोधक स्वप्नात देखील त्यांच्यावर भ्रष्टाचाराचेआरोपकरूशकले नाहीत.त्यांच्याकर्तृत्वाची चढती कमान नियतीला मान्य नव्हती असेच म्हणावे लागेल.८मे१९८८साली ऐनतारूण्याच्या ४५व्या वर्षी पेणमध्ये शासकीय विश्राम गृहात रा.जि.मध्यवर्ती सह.बँकेच्या कामासाठी आलेअसता ह्रदयविकाराच्या  झटक्याने त्यांची प्राणज्योत मावळली.लोभस निर्गर्वी व्यक्तीमत्वाचा जनतेचा कोहिनूर हिरा खेचून नेला.सर्व तळेकर जनता शोकसागरात बुडाले.मृत्यू पुर्वी २महीने आगोदर तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन करण्यात पुढाकार घेतला होता त्यांना संस्थेचे प्रवर्तक म्हणून आदराचे स्थान होते.ते निघून गेल्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. तळेकरांना पडलेल्या स्वप्नाचाभंग झाला.आजअसते तर ३०वर्षात खासदार, आमदार कोणीही होऊ शकले नसते.त्याचे शिक्षण क्षेत्रातील अपूरे राहिलेले स्वप्न पिटसई पंचक्रोशीतील जनतेने कै.दगडू शिंदे गुरुजी कै.बाळशेट देशमुख,एन् जी वेदक,डॉ.वेदक, महादेव गोळे, महीपत(बुवा) गोळे, ह्दय रेडीज कृष्णापंदेरे गुरुजी गोविंद ठाकर गुरुजी नथुराम अडखळे गणपतजगताप कै.शकंरवाजे यांच्या पुढाकाराने पिटसई येथे त्यांंची स्मृती कायम स्वरूपी रहावी या उद्देशाने विद्यामंदिरची स्थापनाकरून तळा तालुक्याला हे स्मारकचउभारूनज्ञानदिप दिवसें दिवस तेजोमय होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा