बाबू शिर्के म्हसळा
मागील एक महिन्यात पालकमंत्री अदिती तटकरे यांनी तीन वेळा म्हसळा ग्रामीण रुग्णालयात कार्यक्रम घेतले त्यातले दोन कार्यक्रम तर मागील पाच दिवसात घेतले.या सततच्या कार्यक्रमामुळे ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर ताण पडत आहे. सध्या म्हसळा तालुक्यात आणी शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. ग्रामीण रुग्णालयात सतत तपासणीसाठी रुग्णांची गर्दी होत आहे.त्यामुळे डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी हे दिवसरात्र मेहनत घेत आहेत. त्यातच असे कार्यक्रम घेतले की संपूर्ण यंत्रणा ही त्यामागे फिरते. ज्यादिवशी कार्यक्रम असेल त्या दिवशी त्या कार्यक्रमाच्या तयारी साठीच तो दिवस फुकट जातो. आणी तपासणीसाठी आलेल्या रुग्णांचे त्यामुळे हाल होत आहेत.या सर्व गोष्टींला पालकमंत्री जबाबदार असून त्यांनी असे कार्यक्रम घेऊ नये अशी मागणी शिवसेना माजी तालुका प्रमुख नंदू शिर्के यांनी त्यांचा कार्यालयात पत्रकारांजवळ वार्तालाप करताना केली. तसेच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना तालुक्यातील कुठल्याही कार्यक्रमाला शिवसेनेला आमंत्रण दिले जात नाही अशी खंत सुद्धा शिर्के यांनी बोलवून दाखवली. मागील चार दिवसात झालेल्या कार्यक्रमात अंबुलन्सचे उदघाटन आणी ऑक्सिजन प्लांटचे उदघाटन करण्यात आले.पण हे दोन्ही कार्यक्रम एका दिवसात सुद्धा होऊ शकले असते. केवळ प्रसिद्धीसाठी लोकांच्या जीवाशी खेळू नका असा टोला नंदू शिर्के यांनी पुढे बोलताना लगावला.
Post a Comment