किरण शिंदे/ माणगाव
माणगाव शहरातील एकता पेट्रोलपपंच्या मागे , सिमरन मोटर पासून थोड्या अंतरावर असलेल्या एका कन्स्ट्रक्शन साईटच्या डबक्यात भल्यामोठ्या २ मगरी बर्याच दिवसापासून दिसून आल्याने आजूबाजूच्या परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. मुख्य म्हणजे याच ठिकाणी अगदी हाकेच्या अंतरावर दवाखाना, मेडिकल आणि मोठी वसाहती ही आहेत आणि त्यामुळे अशाप्रकारे मगरी फिरणे आजूबाजूच्या परिसरातील लोकांना खुप धोकादायक आहे. तसेच शहरात अशा प्रकारे मगरी दिसल्याने संध्याकाळ नंतर लोक घराबाहेर पडण्यास खुप घाबरत आहेत. अनेकदा सांगून सुद्धा वनखात्याने त्याची गंभीर दखल घेतली नाही असे स्थानिकांचे म्हणने आहे. तरी या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडला तर त्याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल माणगावरांकडून केला जात आहे.
Post a Comment