साहित्यसंपदा आयोजित संस्कारसंपदा उपक्रमास उत्तम प्रतिसाद मिळाला असून डॉ. योगेश जोशी ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाची सुरवात झाली. त्यांनी महाराष्ट्र दिनाचे महत्व सांगताना सदर शिबिरांद्वारे रचनात्मक समाज निर्मितीचे काम पार पडेल असे मत व्यक्त केले. करोना काळात आपले कर्तव्य बजावत असताना माणुसकी जपणारे, मदतीला धावून जाणारे असा नावलौकिक असलेले कवी लेखक आणि ठाणे पोलीस संजय पाटील ह्यांची निमंत्रित अतिथी म्हणून उपस्थिती लाभली. त्यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा देताना, साहित्यसंपदाच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहित्यसंपदा संस्थापक वैभव धनावडे ह्यांनी केले. योगा मार्गदर्शक कवयित्री स्मिता हर्डीकर ह्यांनी दिप प्रज्वलन करताना ईशस्तवन सादर केले.
१ मे ला सुरु झालेल्या ह्या कार्यशाळेमध्ये वत्कृत्व विकास कसा करावा ह्या बद्दल सौ. स्मिता हर्डीकर या मुलांना मार्गदर्शन करत आहेत. शिबिरामध्ये चित्रशब्द, शब्द चित्र उपक्रमाचे निर्माते हनुमंत देशमुख मार्गदर्शन करत आहेत. "मनातली पाने" काव्यसंग्रहाच्या कवयित्री सलोनी बोरकर ह्यांच्या बालगीतांचा आस्वाद मुले घेत असून काव्यलेखन, काव्यवाचन करायला मुले शिकली आहेत. शालेय क्षेत्राशी निगडित आपल्या विविध रचनात्मक उपक्रमांमुळे नावाजलेल्या चित्रलेखा जाधव ह्या मुलांना मार्गदर्शन करत असून .मुलांच्या मनोबल विकासासाठी वंदना मत्रे मुलांना श्लोक ,योगा आणि कथा लेखन शिकवत आहेत.
१ मे ते २५ मे अशा साप्ताहिक शिबिराच्या तीन कार्यशाळा पूर्ण झाल्या.
ह्या साप्ताहिक शिबिरामध्ये किशोर वयोगटातील मुले कथा, कविता आणि निबंध लिहायला शिकली असून बाल गटातील आणि किलबिल गटातील मुले शब्दचित्र ह्यांच्या मदतीने शब्द ओळखायला शिकली आहेत. त्याचप्रकारे सायंकाळी होणाऱ्या सामुदायिक प्रार्थनेमुळे मुलांमधील चंचलता दूर होऊन मुले बौद्धिक आणि शारीरिक बाजूने सात्विक, सकारात्मक आणि एकाग्र होण्यास मदत झाली आहे. असा अभिप्राय सगळ्या पालकांकडून आला आहे.
संस्कारसंपदा उपक्रमाच्या माध्यमातून साहित्यसंपदाने सामाजिक भान राखताना, समाजातील आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना, आश्रमातील मुलांना तसेच जिल्हा परिषदेतील सर्व वयोगटातील विद्यर्थ्यांना नमूद कलागुणांचे मार्गदर्शन मोफत उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले असून समाजसेवेतून साहित्यसेवेला हातभार लावण्याचा प्रयत्न करणार आहे. अल्पवयात मराठी साहित्याची ओळख मुलांना होऊन सृजन समाज निर्मितीस हातभार लावण्यासाठी ,२६ मे पासून चालू होणाऱ्या ह्या मोफत कार्यशाळेचा लाभ घेऊन मुलांची नोंदणी करून ह्या सप्तगुणांनी आणि सुप्तगुणांनी भरलेल्या शिबिराचा लाभ घ्यावा.
सदृढ शरीर व सदृढ मन यांच्या या घडीलाच नव्हे तर येणाऱ्या काळात सक्षमपणे उभे राहण्यासाठी अशा शिबिरात अवश्य नोंदणी करावी असे आवाहन साहित्यसंपदा समूहाच्या संस्कारसंपदा विभागाने केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क -
वैभव धनावडे - ९९३००८०३७५
वंदना मत्रे - ९८३३३४३४८१
Post a Comment